भारतीयांना रशियन सैन्यात भरतीसाठी एजंट सक्रिय? अफसानच्या मृत्यूनंतर समोर आले प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:44 PM2024-03-07T12:44:22+5:302024-03-07T12:50:59+5:30

रशिया-युक्रेन सीमेवर गेल्या २ वर्षांपासून युद्ध सुरू आहे. आता भारतीय नागरिकही या युद्धात अडकल्याचे दिसत आहे.

Does the syndicate work to recruit Indians into the Russian army? Read in detail | भारतीयांना रशियन सैन्यात भरतीसाठी एजंट सक्रिय? अफसानच्या मृत्यूनंतर समोर आले प्रकरण

भारतीयांना रशियन सैन्यात भरतीसाठी एजंट सक्रिय? अफसानच्या मृत्यूनंतर समोर आले प्रकरण

गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. 24 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झालेले या दोन देशांमधील हे युद्धअजपृुनही सुरुच आहे. रशिया किंवा युक्रेन दोघेही मागे हटण्यास तयार नाहीत. पण, या विनाशकारी युद्धादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नेपाळ आणि भारतासह इतर अनेक देशांतील लोकही रशियाच्या बाजूने युद्ध लढत आहेत. काही लोक पैशाच्या लालसेपोटी स्वेच्छेने सामील होत आहेत, तर काही लोकांना फसवणूक करून बळजबरीने रणांगणात पाठवले जात आहे.

हैदराबादच्या मोहम्मद अस्फानचा रशियात मृत्यू झाल्यानंतर आता भारतात अशी कोणती सिंडिकेट कार्यरत आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रशियन सैन्यात भारतीयांना कोण प्रलोभन देत आहे, तिथे त्यांना युद्धभूमीत युक्रेनियन सैन्याशी लढण्यासाठी पाठवले जात आहे. रशिया-युक्रेन युद्धात शहीद झालेल्या हैदराबादच्या मोहम्मद अस्फानचा भाऊ खुद्द इम्राननेच हा दावा केला आहे. हैदराबादमध्ये राहणारा इम्रान हा व्यवसायाने व्यापारी आहे.

NDA तील एक मित्र पक्ष दुरावणार?, INDIA आघाडीनं दिली ऑफर; भाजपाची डोकेदुखी वाढली

इमरानने म्हटले आहे की, 'अफसान 9 नोव्हेंबरला 'बाबा व्लॉग'च्या माध्यमातून रशियाला गेला होता. रशिया-युक्रेन युद्धात अफसानसह भारतीयांच्या मृत्यूला रमेश, नाझील, मोईन आणि खुशप्रीत हे एजंट जबाबदार आहेत. चौघांबद्दल माहिती देताना इम्रान म्हणाला, 'रमेश आणि नाझील हे चेन्नईचे रहिवासी आहेत, तर खुशप्रीत मूळची पंजाबची असून तिच्याकडे रशियन पासपोर्ट आहे. अफसान  या लोकांच्याच संपर्कात होता. अफसानला सोडल्यानंतर मी या लोकांच्या संपर्कात होतो. नुकतेच, जेव्हा मी त्याला अफसानबद्दल विचारले तेव्हा त्याने मला सांगितले की अफसानला गोळी लागली आहे, तो जखमी आहे.

अफसानचा भाऊ इम्रान म्हणाला, 'माझ्या भावाला गोळ्या लागल्याचे ऐकून मी घाबरलो आणि मी खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याशी संपर्क साधला. मी ओवेसी साहेबांना भेटायला गेलो आणि तिथून भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला, जेणेकरून मला त्यांच्याशी बोलता येईल. जेव्हा मला कॉल आला तेव्हा मी त्यांना मला अफसानशी संबंधित कोणतेही अपडेट देण्यास सांगितले. एक मिनिट फोन ठेवल्यानंतर दूतावासाच्या अधिकाऱ्याने मला सांगितले की अफसानचा मृत्यू झाला आहे. 

इम्रान पुढे म्हणाला, 'अफसानच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर मी खासदार ओवैसी यांचे घर सोडले आणि माझ्या घरी पोहोचलो. मी पुन्हा दूतावासात फोन केला आणि माझ्या भावाचा मृत्यू कसा झाला हे विचारले. दूतावासाने सांगितले की त्यांना रशियन सैन्याकडून कॉल आला होता आणि यापलीकडे त्यांच्याकडे कोणतीही माहिती नाही. या सर्व प्रकारानंतर मी एजंट खुशप्रीत आणि रमेश यांना बोलालो. ही चुकीची बातमी असू शकते, असे दोघे अजूनही सांगत आहेत. यानंतर त्या दोघांनी सांगितले की, आम्ही दोघेही काही दिवसांनी अफसानला ज्या ठिकाणी सोडले त्या ठिकाणी जाणार आहेत.

युट्युबरचे नाव समोर आले 

इमरान ज्या 'बाबा व्लॉग'बद्दल बोलत आहे तो युट्युबर आहे. तो यूट्यूबवर व्हिडीओ बनवतो आणि लोकांना सांगतो की, लोक वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन कसे काम करू शकतात आणि त्या बदल्यात चांगले पैसे कमवू शकतात. आतापर्यंत त्याने त्याच्या चॅनेलवर 148 व्हिडीओ अपलोड केले आहेत आणि 3 लाखांहून अधिक सदस्य आहेत. या चॅनलवर महिन्याभरापूर्वीचा न्यूझीलंड भेटीचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. 'बाबा व्लॉग' फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतो.

Web Title: Does the syndicate work to recruit Indians into the Russian army? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.