शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पंतप्रधानांकडे डोकलाम प्रश्नावर तोडगा आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 3:29 AM

डोकलाममध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना कसा करावा, याचा तोडगा ‘५६ इंचाची छाती असलेल्यांकडे असावा, अशी आशा आहे

नवी दिल्ली : डोकलाममध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना कसा करावा, याचा तोडगा ‘५६ इंचाची छाती असलेल्यांकडे असावा, अशी आशा आहे,’ असा टोला काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. डोकलाम हा आमचाच प्रदेश असून, गेल्या वर्षी येथे जे घडले, त्यापासून भारताने धडा शिकायला हवा, असे चीनने सोमवारी म्हटले होते.या अनुषंगाने केलेल्या टिष्ट्वटमध्ये राहुल गांधी यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात केलेल्या टिष्ट्वटर पोलमध्ये हजारो लोक सहभागी झाले. डोकलामचा प्रश्न सोडविण्यासाठी नरेंद्र मोदी आलिंगन नीतीचा उपयोग करतील, संरक्षणमंत्र्यांना दोष देतील व जाहीरपणे अश्रू ढाळतील, असे या पोलमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ६३ टक्के लोकांना वाटते. मात्र, ५६ इंचाची छाती असलेल्यांकडे डोकलाममधील स्थितीवर मात करण्यासाठी ठोस तोडगा असावा, अशी आशा आहे.सिक्कीमच्या सीमेला लागून असलेल्या डोकलाममध्ये चीनच्या लष्कराने रस्ता बांधायला घेतला होता. त्याला भारतीय लष्कराने आक्षेप घेतला. चीनी लष्कराने डोकलाममध्ये एक प्रकारे घुसखोरीच चालविली होती. ती रोखण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झाले. त्यामुळे भारत व चीनचे लष्कर संघर्षाच्या पवित्र्यात डोकलाममध्ये उभे ठाकले. ही स्थिती सुमारे ७३ दिवस कायम होती. भारताने आपले सैन्य मागे नेण्यास ठाम नकार दिला होता. सरतेशेवटी चर्चा होऊन दोन्ही देशांनी आपले सैन्य माघारी नेले. मात्र, तरीही डोकलाममधील तणाव पूर्णपणे संपलेला नाही. आता चीनने पुन्हा या भागात बांधकाम सुरू केल्याच्या बातम्या झळकल्या होत्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीDoklamडोकलामchinaचीन