शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीला अनुकंपा नोकरी मिळते का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 10:33 IST

वडिलांच्या मृत्यूनंतर कायद्याने त्यांच्या जागी मुलीला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्याचा अधिकार आहे.

सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूपश्चात वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येते. यामध्ये मृत कर्मचाऱ्याचे अपत्य किंवा पत्नी यांचा विचार केलेला आहे. परंतू, आईची इच्छा नसेल तर मुलगा किंवा मुलगी ही नोकरी करू शकत नाही, असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

वडिलांच्या मृत्यूनंतर कायद्याने त्यांच्या जागी मुलीला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्याचा अधिकार आहे. मात्र, मध्य प्रदेश पोलीसमध्ये कर्मचाऱ्याची मुलगी वडिलांच्या मृत्यूनंतर नोकरी करत आहे, ती पात्र आहे. परंतू तिची विधवा आई तिला ही नोकरी दिली जाऊ नये असे म्हणत आहे. जे मध्य प्रदेश सरकारच्या नियमांनुसार गरजेचे आहे. याचाच अर्थ विधवा पत्नीची संमती नसेल तर सरकारी कर्मचाऱ्याच्या निधनानंतर अपत्याला नोकरी मिळू शकत नाही. यासाठी त्या कर्माच्याऱ्याच्या पत्नीची संमती असणे आवश्यक आहे. प्रकरण असे होते की, विधवा पत्नीने आपल्या मुलाला पोलीस विभागात सब इन्स्पेक्टरची नोकरी द्यावी असा अर्ज केला होता. मात्र, पोलीस दलाने तो अनफिट असल्याचे दाखवत नोकरी देण्यास २०१५ मध्ये नकार दिला होता. यानंतर मुलीने अर्ज केला होता. मात्र, त्यांच्यात वाद आहे. मुलीने वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळावा यासाठी केस दाखल केलेली आहे. ही केस अद्याप न्यायालयात सुरु आहे. 

या कारणाने कर्मचाऱ्याच्या पत्नीने मुलीला नोकरी न मिळण्यासाठी पोलीस दलाला कळविले. यामुळे पोलीस विभागाने आईची परवानगी नसल्याने मुलीचा नोकरीचा अर्ज रद्द केला. यानंतर हे प्रकरण मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात गेले होते. तिथे न्यायालयाने पोलीस दलाच्या बाजुने निकाल दिला. याविरोधात ही मुलगी सर्वोच्च न्यायालयात गेली होती. तिथेही तिच्याविरोधात निकाल गेला आहे. यासाठी मध्य प्रदेशच्या नियमांचा आधार घेण्यात आला आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेश