दरोड्याचे प्रकरण
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:19+5:302015-02-13T00:38:19+5:30
१३ लाखांच्या दरोड्यातील आरोपीस

दरोड्याचे प्रकरण
१ लाखांच्या दरोड्यातील आरोपीसअटकपूर्व जामीन नाकारलानागपूर : कळमना भागातील सोनबानगर येथील महिंद्रा प्रोव्हिन्शियल ट्रॅक्टर शो-रूमवरील १३ लाखांच्या दरोड्यातील एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. शेख अकबर ऊर्फ कालू शेख रेहमान (२४) असे आरोपीचे नाव असून, तो मेकोसाबाग येथील रहिवासी आहे. प्रकरण असे, २१ ऑक्टोबर २०१४ रोजी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास प्रभाकर हेडाऊ हा सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असताना दरोडेखोरांनी पट्ट्याने त्याचे हातपाय बांधून महिंद्रा प्रोव्हिन्शियल ट्रॅक्टर शो-रूमवर दरोडा घातला होता. दरोडेखोरांनी आठ लाख रुपये रोख असलेली तिजोरी, चेकबुक, चांदीचे शिक्के, असा ऐवज लुटून नेला होता. त्यापैकी एचडीएफसी बँकेचा पाच लाखांचा एक चेक हिंगणा येथील सेंट्रल बँकेतील धर्मराज केणे याच्या खात्यात वळता करून वटविण्यात आला होता. हाच आधार घेत गुन्हे शाखा पोलिसांनी तपास करून मौद्याच्या कोदामेंढी येथे राहणाऱ्या रजत विनोद कोलते याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती. त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली होती. कोलते हाच या दरोड्याचा सूत्रधार निघाला होता. तो महिंद्रा कंपनीचा कमिशन एजंट होता. विकलेल्या ट्रॅक्टरचे पैसे त्याने हडप केले होते. शेख अकबर आणि अन्य एक या गुन्ह्यात फरार आहे. अटक टाळण्यासाठी अकबरने केलेला अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्चना नायर यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. सानप हे आहेत.