मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुरोहितांना मिळाला दस्तावेज
By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30
नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना न्यायालयाने त्यांच्या केलेल्या चौकशीशी संबंधित दस्तावेज लष्कराकडून मिळाला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी पुरोहितांना मिळाला दस्तावेज
न ी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना न्यायालयाने त्यांच्या केलेल्या चौकशीशी संबंधित दस्तावेज लष्कराकडून मिळाला आहे. आपण या खटल्यात निदार्ेष आहोत हे सिद्ध करण्यासाठी या दस्तावेजाचा पुरोहित यांना उपयोग होऊ शकेल. माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा दस्तावेज पुरोहित यांच्या वकील नीला गोखले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हा दस्तावेज पुरोहित यांनी गुप्त माहिती काढण्यासाठी जे स्रोत वापरले त्याच्या नोंदींशी संबंधित असून पुरोहित यांनी गुप्तचर म्हणून जी कामे केली त्यांची माहिती ते त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना सतत देत होते हे सिद्ध करणारे आहेत, असे नीला गोखले म्हणाल्याचे कळते. तथापि, नीला गोखले यांच्याशी थेट संपर्क होऊ शकलेला नाही. माझे निदार्ेषत्व सिद्ध करण्यासाठी मला हा दस्तावेज देण्यात यावा, अशी मागणी पुरोहित यांनी केली होती. त्यानुसार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तो त्यांना देण्याचे आदेश लष्कराला दिले होते.---------------