गरीबांचा इलाज न करणा-या डॉक्टरांचे हात तोडायला हवेत - जितनराम मांझी
By Admin | Updated: October 18, 2014 03:31 IST2014-10-18T03:31:54+5:302014-10-18T03:31:54+5:30
बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी हे सध्या वादग्रस्त विधानांमुळे देशभरात चर्चेचा विषय झाले आहेत.

गरीबांचा इलाज न करणा-या डॉक्टरांचे हात तोडायला हवेत - जितनराम मांझी
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १७ - बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी हे सध्या वादग्रस्त विधानांमुळे देशभरात चर्चेचा विषय झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान करून नव्याने चर्चेला विषय पुरवला आहे. गरीबांचा इलाज न करणा-या डॉक्टरांचे हात तोडायला हवेत असे विधान मांझी यांनी केले आहे. या आधी त्यांनी लहानवयात लग्न केल्याने उंची खुंटत असल्याचा शोध लावत चर्चेला विषय पुरवला होता. तर आत्ता थेट डॉक्टरांच्या हात तोडण्याबद्दल भाष्य केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
मोतीहारी जिल्ह्यातील एका सभेत बोलताना मांझी यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी मांझी यांनी असे म्हटले की, ज्यावेळी मी पाटणा येथील औषध घोटाळ्याचा शोध लावला त्यावेळी मी अनेक अधिका-यांना घरी बसवले. तसेच पीएमसीएच घोटाळ्याबाबतही मी कडक पावले उचलली होती. तेव्हा गरीबांचा इलाज करण्यात जर कोणत्या डॉक्टरने हलगर्जीपणा केला तर त्याचे हात तोडून टाकले जातील असे वादग्रस्त विधान मांझी यांनी केले