शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

पाकव्याप्त काश्मीरमधील वैद्यकीय पदवी भारतात अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 2:15 AM

एमसीआयची सार्वजनिक सूचना; पाकिस्तान सरकारची काश्मिरी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची योजना रोखली

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मिरातील वैद्यकीय महाविद्यालयातून घेतलेली वैद्यकीय शिक्षणाची पदवी भारतात मान्य असणार नाही, असे भारतीय वैद्यकीय परिषदेने (एमसीआय) एका सार्वजनिक सूचनेद्वारे जाहीर केले आहे. यंदापासून दरवर्षी १,६00 काश्मिरी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केली होती. एमसीआयच्या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या योजनेतील हवाच निघून गेली आहे.पाकव्याप्त काश्मिरातील वैद्यकीय पदवीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने एमसीआय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयास काही महिन्यांपूर्वी दिले होते. त्यानुषंगाने एमसीआयने ही सार्वजनिक सूचना जाहीर केली आहे.पाकव्याप्त काश्मिरात वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या एका काश्मिरी विद्यार्थिनीने दाखल केलेल्या याचिकेमुळे या विषयाला तोंड फुटले होते. विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना भारतात एक परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. पाकव्याप्त काश्मिरातून शिक्षण घेऊन आलेल्या एका विद्यार्थिनीने या परीक्षेसाठी अर्ज केला होता. तथापि, तिला परीक्षेस बसू देण्यात आले नव्हते. त्यामुळे तिने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने डिसेंबर २0१९ मध्ये एमसीआय आणि परराष्ट्र मंत्रालयास आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. याचदरम्यान यंदा फेब्रुवारीमध्ये पाक सरकारने १,६00 काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. काश्मिरी तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणून पाक सरकारने ही योजना आणली होती. एमसीआयच्या निर्णयाने तिला चाप बसला आहे.यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानकडून काश्मिरी तरुणांना स्वस्त शिक्षणाच्या योजना दिल्या गेल्या आहेत. यातील बहुतांश योजना फुटीरवादी नेत्यांच्या सांगण्यावरून आणल्या गेल्या आहेत. तथापि, अनेकदा वैध मार्गांनी पाकिस्तानात गेलेले विद्यार्थी अतिरेकी बनून नियंत्रण रेषेवरून घुसखोरीच्या मार्गाने भारतात परतल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत. जे विद्यार्थी खरोखर अभ्यास करून परत येतात ते कट्टरपंथी बनलेले असतात, असाही अनुभव आहे.एमसीआयने काय म्हटले?एमसीआयच्या सार्वजनिक सूचनेत म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरचा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश आणि संपूर्ण लदाख भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यानुसार, पाकच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर आणि लदाख (पीओजेकेएल) येथील वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या कोणत्याही संस्थेस भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ अन्वये मंजुरी आवश्यक आहे.‘पीओजेकेएल’मधील कोणत्याही महाविद्यालयास अशी मंजुरी नाही. त्यामुळे येथील महाविद्यालयांत शिक्षण घेतलेला कोणताही विद्यार्थी एमसीआय कायद्यान्वये नोंदणी मिळण्यास पात्र नाही. अशा पदवीधरांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही.

टॅग्स :doctorडॉक्टरPOK - pak occupied kashmirपीओके