शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 09:46 IST

विमान अपघातानंतर बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील इमारती रिकाम्या करायला सांगितल्यानंतर एका डॉक्टरने रडत त्याची व्यथा मांडली होती.

Ahmedabad Plane Crash:अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या विमान अपघातात काही सेकंदातच २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अहमदाबादवरुन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदामध्ये कोसळले. या अपघातानंतर विमान प्रवाशांसह २७० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. हे विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या मेस इमारतीला धडकल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे इमारतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच इमारतीमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरचा व्हिडीओ अपघातानंतर व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो आम्हाला लगेच खोली करण्यासाठी सांगण्यात आल्याचे म्हणत होता. आता त्याच डॉक्टरचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये त्याने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताची सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील चार इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. इथल्या राहणाऱ्या सर्व डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना जागा रिकामी करण्यास सांगण्यात आलं होतं. यूएन मेहता रुग्णालयात काम करणारे डॉ. अनिल पनवार यांचे कुटुंबही या अपघाताच्या विळख्यात सापडलं होतं. अपघातानंतर त्यांनी सरकारला त्यांचे घर रिकामे करण्यासाठी आणखी काही वेळ देण्याची विनंती केली होती. माध्यमांसमोर येऊन त्यांनी रडत आपली कैफियत मांडली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर डॉ. पनवार यांनी त्यावेळी आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो असं म्हटलं आहे.

बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या काही इमारती चौकशीसाठी रिकामी करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर तिथे राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या अपघातात डॉ. अनिल पनवार यांची मुलगी जखमी झाली. त्यांनाही घर रिकामे करण्याच्या आदेश दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी रडत कॅमेऱ्यांसमोर आपला मुद्दा मांडला होता. आता समोर आलेल्या नव्या व्हिडीओमध्ये पनवार यांनी पोलिस प्रशासन आणि रुग्णालयाने मला खूप मदत केली आहे आणि आम्हाला एक खोली देखील देण्यात आली आहे असं म्हटलं.

"गेल्या दोन दिवसांपासून मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो आणि भावनिकदृष्ट्या अस्थिर होतो. भावनेच्या भरात त्या दिवशी संध्याकाळी मी खूप काही बोलून गेलो. मी ते कसे बोललो हे देखील माहित नव्हतं. पण तसे नाहीये. मला खूप मदत मिळाली आहे. पोलिस प्रशासन आणि रुग्णालयाने मला खूप मदत केली आहे, ज्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. मी आणि माझे कुटुंब सर्वजण सुरक्षित आहोत. आम्हाला आधी एक खोली देण्यात आली होती आणि आम्हाला दुसरी खोली देण्यात आली आहे. ज्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटत आहे. मला फक्त एवढंच सांगायचे आहे की सर्वांनी मला खूप मदत केली आहे. मी आनंदी आहे की आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत," असं डॉ. पनवार नव्या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

काय म्हणाले होते डॉ. पनवार?

"रातोरात घर रिकामं करणं इतकं सोपं नाही. आम्हाला आणखी दोन-तीन दिवस वेळ द्यावा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझी मुलगी आणि मे़ड रुग्णालयात दाखल आहेत, मी यावेळी तिथे असायला हवं. मला घर रिकामं करण्यासाठी वेळ द्या, हा मेसेज वरपर्यंत पाठवा, थोडी माणुसकी दाखवा, मी गुजरातचा नाही, मी असहाय्य आहे, माझी काही चूक नाही, मी आणि माझी पत्नी अपघात झाला तेव्हा रुग्णालयात काम करत होतो, आम्ही चार वर्षांपासून येथे राहत आहोत. प्लीज, आम्हाला मदत करा," असं आवाहन डॉ. पनवार यांनी केलं होतं.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातdoctorडॉक्टर