शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 08:19 IST

दिल्लीत हॉस्पिटलमध्ये घुसून एका डॉक्टरची त्याच्यात कॅबिनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Delhi Crime : दिल्लीतील जैतपूर परिसरातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये घुसून दोघांनी डॉक्टरची हत्या केली.  घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी थेट हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरला गोळ्या घातल्या. उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी डॉक्टरची निर्घृणपणे हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

कालिंदी कुंज पीएस परिसराती जैतपूर येथील निमा हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जावेद नावाच्या डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन पुरुष जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना भेटण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. डॉक्टरच्या हत्येनंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला.

जखमी झाल्याचा बहाणा करत दोन हल्लेखोरांनी हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टरला त्याच्याच केबिनमध्ये मारले. दोन्ही आरोपींनी डॉक्टरवर गोळी का मारली आणि त्यांच्यात काय वैर होते, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस हॉस्पिटलचे आणि डॉक्टरच्या केबिनचे सीसीटीव्ही तपासत असून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

जखमी असल्याचे सांगत दोन तरुण हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांच्यावर उपचाक करुन जखमेवर ड्रेसिंग करण्यात आली. यानंतर त्यांनी डॉक्टरांना भेटायचे असल्याचे सांगितले. दोघेही डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचताच त्यांनी डॉक्टर जावेदवर गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे जावेद यांना नेमकं काय झालं कळलं नाही. गोळ्या लागल्याने जावेद यांचा जागीच मृत्यू झाला. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस