शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला लागली चोरीची चटक, दवाखाना बंद करून बनवली टोळी, १४० कार चोरल्या, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:39 IST

Gujarat Crime News: अनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दे धक्का या मराठी विनोदी चित्रपटात धनाजी नावाच्या पात्राला चोरी करण्याचा रोग झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र आता गुजरातमधील बडोदा येथून समोर आलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये चक्क एक डॉक्टरच चोरीची चटक लागल्याने डॉक्टरकी सोडून अट्टल चोर बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दे धक्का या मराठी विनोदी चित्रपटात धनाजी नावाच्या पात्राला चोरी करण्याचा रोग झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र आता गुजरातमधील बडोदा येथून समोर आलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये चक्क एक डॉक्टरच चोरीची चटक लागल्याने डॉक्टरकी सोडून अट्टल चोर बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  बडोद्यामध्ये क्राईम ब्रँचने तीन कार चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून, त्यापैकी एक जण डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे.  या तिघांविरोधात आतापर्यंत १४० हून अधिक तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच अटक होईपर्यंत हे तिघेही बडोद्यातील पोलीस ठाण्यामध्ये वाँटेड होते.

या चोरांविरोधात सर्वप्रथम करेलीबाग आमि रावपुरा पोलीस ठाण्यामध्ये कारचोरीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. क्राईम ब्रँचकडून त्याचा तपास  सुरू होता. दरम्यान,  एक व्यक्ती इको कार घेऊन बडोद्याला आली असून, तिच्याकडील कार ही चोरीची आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्या व्यक्तीला पकडले. पकडण्यात आलेल्या व्यक्तीने आपलं नाव हरेश मानिया असल्याचे सांगितले.

हरेश याचे आणखी दोन सहकारीसुद्धा बडोद्यामध्ये आले असल्याची माहिती चौकशीमधून समोर आली. त्यानंतर पोलिसांनी अरविंद मानिया आणि ताहेर अन्वर हुसेन या दोघांना पकडले. हरेश आणि अरविंद हे भाऊ असल्याचेही पोलीस तपासामधून उघड झाले. दरम्यान, ते गाड्या चोरून राजकोटला पाठवायचे. तिथे या गाड्यांचे स्पेअर पार्ट वेगळे करून विकले जात असल्याचे तपासामधून समोर आले. या तिघांविरोधात आतापर्यंत १४० हून अधिक कार चोरल्याची तक्रार नोंद आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हरेश याच्या जवळ बीईएमएसची पदवी आहे. तसेच एकेकाळी त्याने स्वत:चा दवाखानाही उघडला होता. मात्र त्याला कारचोरीची चटक लागली. त्यानंतर त्याने हा दवाखाना बंद करून चोरांची टोळी सुरू केली. अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्याकडून एक इको आणि एक ब्रेझा कार जप्त केली आहे. सध्या तिघांनाही ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीGujaratगुजरातdocterडॉक्टर