शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"चांगल्या सुविधा हव्यात की, खात्यात पैसे? ठरवा’’, फ्रीबीजबाबत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:03 IST

Arvind Panagariya Express Concern Over Freebies: या फ्रीबीज योजनांचा राजकीय पक्षांना सत्तेत येण्यासाठी फायदा होत असला तरी त्या दीर्घकालीन विचार केल्यास नुकसानकारक ठरतात. या होणाऱ्या नुकसानाकडे मोदी सरकारमधील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ आणि १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी लक्ष वेधलं आहे.

मागच्या काही काळामध्ये भारतात विविध फ्रीबीज योजनांची घोषणा करून त्याचे काही लाभ जनतेला देऊन हमखास निवडून येण्याचा फंडा सर्वच राजकीय पक्षांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. या योजनांचा राजकीय पक्षांना सत्तेत येण्यासाठी फायदा होत असला तरी त्या दीर्घकालीन विचार केल्यास नुकसानकारक ठरतात. या होणाऱ्या नुकसानाकडे मोदी सरकारमधील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ आणि १६व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी लक्ष वेधलं आहे. पनगढिया यांनी देशातील फ्रीबिज अर्थव्यवस्थेच्या पडलेल्या पायंड्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपल्याला मोफतच्या वस्तू हव्या आहेत की चांगले रस्ते, चांगलं सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छ पाणी हवं आहे, हे लोकांनीच ठरवलं पाहिजे, असं विधान पनगढिया यांनी केलं आहे.

अरविंद पनगढिया हे गोव्याची राजधानी असलेल्या पणजीमध्ये आले असताना त्यांना राज्यांकडून पायाभूत सुविधांच्या विकासाठी देण्यात आलेल्या निधीचा वापर जनतेला मोफत वस्तू देण्यासाठी होणं कितपत चिंताजनक आहे, असं विचारण्यात आलं. त्यावेळी पनगढिया म्हणाले की, ‘’जर निधी विकास योजनांसाठी दिला गेला असेल तर त्याचा वापर हा त्याचसाठी झाला पाहिजे. मात्र लोकशाहीमध्ये अंतिम निर्णय हा निवडून दिलेलं सरकारच घेतं’’. राज्यांकडून पाडण्यात आलेल्या या पायंड्याबाबत चिंता व्यक्त करताना पनगढिया पुढे म्हणाले की, हा निर्णय वित्त आयोगाकडून घेतला जात नाही. वित्त आयोग व्यापक आर्थिक स्थिरतेच्या समग्र हितामध्ये हा मुद्दा उपस्थित करू शकतो. आयोग सामान्य पातळीवर काही सांगू शकतो. मात्र राज्यांनी पैसे कसे खर्च करावेत, यावर नियंत्रण आणू शकत नाही.

यावेळी फ्रीबीजची निवड करायची की पायाभूत सुविधांच्या विकासाची निवड करायची याचा निर्णय घेण्याची अंतिम जबाबदारी पनगढिया यांनी जनतेवर टाकली. ते म्हणाले की, अंतिम जबाबदारी ही जनतेवर असते. कारण नागरिकच सरकारची निवड करतात. जर नागरिक मोफत सुविधांच्या आधारावर सरकारसाठी मतदान करत असतील तर याचा अर्थ ते मोफत सुविधा मागत आहेत, असा होतो. शेवटी आपल्याला चांगल्या सुविधा हव्या आहेत, चांगले रस्ते, चांगलं सांडपाणी व्यवस्थापन, चांगलं पाणी हवं आहे की, बँक खात्यात ट्रान्सफर केलं जाणारं फ्रीबीज हवं आहे, हे जनतेनं ठरवलं पाहिजे, असेही पनगढिया म्हणाले.  

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाIndiaभारतGovernmentसरकार