स्टुडंट व्हिसासाठी टॉफेल परीक्षा देणं गरजेचं आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 06:39 PM2018-05-28T18:39:44+5:302018-05-28T19:32:37+5:30

स्टुडंट व्हिसासाठी टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज ए फॉरिन लँग्वेज (टॉफेल) इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम (आयएलटीएस) या परीक्षा देणं गरजेचं आहे का?

Do you need to take the tofel exam for a student visa? | स्टुडंट व्हिसासाठी टॉफेल परीक्षा देणं गरजेचं आहे का?

स्टुडंट व्हिसासाठी टॉफेल परीक्षा देणं गरजेचं आहे का?

googlenewsNext

प्रश्न - स्टुडंट व्हिसासाठी टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज ए फॉरिन लँग्वेज (टॉफेल) इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम (आयएलटीएस) या परीक्षा देणं गरजेचं आहे का?
उत्तर-  नाही. मात्र काही महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये टॉफेल किंवा आयएलटीएस सारख्या परीक्षांचे गुण त्यांचे अर्ज भरताना विचारात घेताना. मात्र स्टुडंट व्हीसासाठी परीक्षांची गरज नाही.

जेव्हा तुम्ही अमेरिकेतील प्रमाणित शिक्षणसंस्थेत प्रवेश घेता तेव्हा तुम्हाला आय-20 हा अर्ज देण्यात येतो. त्यामध्ये तुम्ही निवडलेल्या अभ्यासक्रमास लागणारी इंग्रजी येण्याची पातळी, गुणवत्ता याबाबत माहिती द्यावी लागते. त्यानंतर व्हिसा मुलाखतीमध्ये तुम्ही आय-20 अर्जात दिलेल्या माहितीनुसार तुमच्या इंग्रजीची गुणवत्ता तुम्हाला दाखवावी लागते.
सध्या प्रवासाचा हंगाम सुरु असल्यामुळे व्हिसा मुलाखतीच्या वेळा पुढे ढकलल्या जाऊ शकतात त्यामुळे ते टाळण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर व्हिसा मुलाखतीसाठी अर्ज करायला हवेत. त्याचप्रमाणे तुम्ही स्टुडंट व्हिसा डेचाही विचार करु शकता. यंदा स्टुडंट व्हिसा डे 6 जून रोजी आहे. यादिवशी आमचे सर्व अधिकारी अर्जदार विद्यार्थ्यांची व्हिसा मुलाखत घेतात.
तसेच विद्यार्थ्यांनाही अनेक इतर विद्यार्थ्यांना भेटता येईल आणि अमेरिकेत शिकण्याचे नवनवे मार्ग व इतर विद्यार्थी उपक्रमांची माहिती मिळू शकेल. तुमच्या व्हिसा मुलाखतीची वेळ आजच घ्या !
 

Web Title: Do you need to take the tofel exam for a student visa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.