शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राजकीय पक्षाला विचारुन आम्ही आदेश देतो का? कोर्टाने फटकारल्यानंतर CM रेवंत रेड्डींचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 13:12 IST

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माफी मागितली आहे

Telangana CM Revanth Reddy :तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्ली मद्य धोरण प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये रेवंत रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली आहे. आमचा आदर न केल्यास खटला अन्यत्रही चालवला जाऊ शकतो, असा इशारा सुप्रीम कोर्टाने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिला होता. त्यानंतर रेड्डी यांनी माफीनामा सादर केला.

कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात नुकताच बीआरएस नेत्या के. कविता यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला. ईडी आणि सीबीआयच्या दोन्ही प्रकरणात प्रत्येकी १० लाखांच्या जामीनावर कविता यांना सोडण्यात आलं आहे. पाच महिन्यांनी के. कविता या तुरुंगाबाहेर आल्या आहेत. अशातच के. कविता यांच्या जामिनासाठी भाजप आणि बीआरएस यांच्यातील सौदेबाजी झाल्याचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाने सुप्रीम कोर्टाचेही लक्ष वेधले होते. त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना सुप्रीम कोर्टाने अशा विधानांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते असं म्हटलं होतं.

सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या शब्दांबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मुख्यमंत्री रेड्डी यांनी आपले निवेदन दिलं आहे.  भारतीय न्याय व्यवस्थेवर माझा दृढ विश्वास आहे आणि मला त्या विधानाबद्दल खेद वाटतो. २९ ऑगस्ट रोजी प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या माझ्या वक्तव्यावरून मी माननीय न्यायालयावर प्रश्न उपस्थित करत असल्याचे दिसते. माझा न्याय आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे. मी न्यायव्यवस्थेचा नेहमीच आदर करेन, असं मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं.

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रेड्डी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना फटकारलं होतं. "त्यांनी काय म्हटले ते तुम्ही वर्तमानपत्रात वाचले आहे का? ते काय म्हणाले फक्त वाचा. एका जबाबदार मुख्यमंत्र्यांचे हे विधान कसले? यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी असे विधान करावे का? घटनात्मक पदावर असणारी व्यक्ती असे बोलत आहे का?", असे सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.

"कोर्टाला त्यांनी राजकारणात का ओढावे? राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून आम्ही आदेश देतो का? राजकीय नेते किंवा इतर कोणीही आमच्या निर्णयांवर टीका करण्यास आम्हाला हरकत नाही. आम्ही आमच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार आणि शपथेनुसार कर्तव्य बजावतो," असेही खंडपीठाने सुनावले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयTelanganaतेलंगणा