सरकारवर विसंबून न राहता कामाला लागा!
By Admin | Updated: October 4, 2014 02:50 IST2014-10-04T02:50:33+5:302014-10-04T02:50:33+5:30
नागरिक आपली सुप्त क्षमता जागवून कामाला लागला तर भारत निश्चितपणो सामथ्र्यशाली होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

सरकारवर विसंबून न राहता कामाला लागा!
>पंतप्रधान मोदींचे आवाहन : ‘आकाशवाणी’वरून प्रथमच ‘मन की बात’
नवी दिल्ली : हा देश फक्त सरकारचा नाही, तर तो 125 कोटी भारतीयांपैकी प्रत्येकाचा आह़े ही भावना मनात ठेवून प्रत्येक नागरिक आपली सुप्त क्षमता जागवून कामाला लागला तर भारत निश्चितपणो सामथ्र्यशाली होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
विजयादशमीच्या निमित्ताने मोदी यांनी ‘आकाशवाणी’वरून 15 मिनिटांचे हिंदी भाषण करून आपले मनोगत देशवासीयांपुढे मांडले. खासकरून गोरगरीब आणि ग्रामीण भागातील नागरिकांर्पयत पोहोचण्यासाठी पंतप्रधानांनी प्रथमच रेडिओ या प्रसारमाध्यमाचा वापर केला.
मोदी म्हणाले, की स्वत:चे सामथ्र्य विसरल्याने व आत्मसन्मान गमावून बसल्याने आपली अवस्था स्वत:च्याच
देशात निराश्रीतासारखी झाली आह़े पण वास्तव तसे नाही. भारतीय जगात अद्वितीय आहेत. सव्वाशे कोटी भारतीयांमध्ये अपार शक्ती, अपार सामथ्र्य आहे. प्रत्येकाने आपले सामथ्र्य ओळखण्याची गरज आहे.
प्रत्येक नागरिकाने स्वसामथ्र्य ओळखून व आत्मसन्मान जागवून पुढे पाऊल टाकले तर देश निश्चितपणो विजयी होईल, यशस्वी होईल. देशासाठी जे काही करायचे ते सरकार करेल, असा विचार केल्यानेच आज देशाची अशी अवस्था झाली आहे, यावर भर देऊन मोदी म्हणाले पुढे की, आपल्याला बोटाला धरून नेणारा कोणी मिळणार नाही.
जोर्पयत आपण स्वत: उभे राहून पुढे जाण्याचा संकल्प करणार नाही तोर्पयत आपल्याला मार्ग दिसणार नाही. दुसरा कोणीतरी आपल्याला घेऊन जाईल याची वाट न पाहता चालण्याची सुरुवात आपल्याला प्रत्येकाला करावी लागेल. सव्वाशे कोटी देशवासीयांमध्ये स्वत: उभे राहून चालण्याचे सामथ्र्य आहे व ते तसे चालून देशालाही पुढे घेऊन जातील, याबद्दल मला दृढविश्वास आहे.
विजयादशमी हे आपल्यातील वाईट गोष्टींचा त्याग करण्याचा संकल्प करण्याचे पावन पर्व असते, याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी देशवासीयांना यानिमित्त देश घाण-कच:यापासून मुक्त करण्याचे आवाहन केले. यासाठी गुरुवारपासून सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानास जनआंदोलनाचे स्वरूप येऊन ते यशस्वी होईल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
रविवारी करणार संवाद
च्नागरिकांपुढे ‘आकाशवाणी’च्या माध्यमातून ‘अपने मन की बात’ मांडणो यापुढेही सुरू ठेवण्याचा मानस मोदींनी व्यक्त केला.
च्यापुढे जेव्हा केव्हा मला लोकांशी बोलावेसे वाटेल तेव्हा ते मी रविवारी सकाळी 11 वाजता रेडिओवरून बोलेन, असे त्यांनी सांगितले.
च्तसेच हा केवळ एकतर्फी संवाद राहू नये यासाठी लोकांनी आपले विचार, सूचना व प्रतिक्रिया या वेबसाइटवर कळवाव्या, असेही त्यांनी आवाहन केले.
खादी वापरा
प्रत्येकाने आपल्या घरात खादीची एक तरी वस्तू वापरावी आणि गरिबांच्या जीवनात प्रकाशाची लकेर उमटवावी, असेही त्यांनी आवाहन केले.