शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लाभांसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका, डॉ. स्वामीनाथन यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 10:58 IST

अर्थव्यवस्थेला मारक : डॉ. स्वामीनाथन यांचा राजकीय पक्षांना सल्ला

नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये विजयी होण्याकरिता शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये. असे निर्णय आर्थिकदृष्ट्याही व्यवहार्य नसतात असा सल्ला देशातील हरित क्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांनी दिला आहे. ते म्हणाले की, कृषी क्षेत्रासमोरील अडचणी या आर्थिक स्वरुपाच्याच असतात. पाऊस व बाजारपेठेतील उलाढाली यावर लहान शेतकऱ्यांची व्यवहारक्षमता ठरत असते. अर्थव्यवस्थेला मारक अशी धोरणे राजकारण्यांनी राबवू नयेत.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ राज्यांतील विधानसभा निवडणुकांत विजयी झाल्यानंतर काँग्रेसने तेथील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. विजयी झाल्यास शेतकऱ्यांना दहा दिवसांत कर्जमाफी देऊ असे आश्वासन त्या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात दिले होते. या अनुषंगाने डॉ. स्वामीनाथन म्हणाले की, जेव्हा शेतकऱ्यांना खरोखरच कर्ज फेडणे शक्य नसेल तेव्हा त्यांना ही रक्कम माफ करण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरतो. शेती ही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व फायदेशीर करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करायला हवेत. त्यामध्ये कर्जमाफीसारखे निर्णय घेणे अपेक्षित नसते.युवकांना शेतीकडे आकर्षित करावाढत्या कृषी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करा, अशी मागणी दिल्लीत काही महिन्यांपूर्वी निदर्शने करणाऱ्यां शेतकऱ्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकांत पाचपैकी तीन राज्यांत शेतकºयांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून काँग्रेसला जे यश मिळाले, त्यामुळे सारेच पक्ष धास्तावले आहेत. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन प्रत्येक पक्ष आता शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा सवलती देण्याच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात डॉ. स्वामीनाथन म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व तरुणांनी कृषी व्यवसायाकडे आकर्षित व्हावे यासाठी धोरणे आखली पाहिजेत.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप