धरणे देणा-यांना मत नको, मोदींचे आवाहन

By Admin | Updated: February 2, 2015 08:54 IST2015-02-02T01:44:13+5:302015-02-02T08:54:49+5:30

प्रचारात सक्रिय झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आम आदमी पार्टीला(आप) अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले़ दिल्लीचा विकास हवा असेल

Do not vote for the donors, Modi's appeal | धरणे देणा-यांना मत नको, मोदींचे आवाहन

धरणे देणा-यांना मत नको, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : प्रचारात सक्रिय झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आम आदमी पार्टीला(आप) अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले़ दिल्लीचा विकास हवा असेल तर भाजपाला मत द्या़ धरणे देणाऱ्यांना आणि अशांना साथ देणाऱ्यांना मत देऊ नका, असे आवाहन त्यांनी दिल्लीकरांना केले़
आप आणि काँग्रेस दोघांमध्येही पडद्यामागून मेतकूट असल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला़ गत निवडणुकीनंतर आप व काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले़ मात्र नव्याने निवडणुका जाहीर होताच, दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध गळा काढणे सुरू केले़ दोन्ही पक्षांत खोटे बोलण्याची स्पर्धा सुरू आहे़ मीडियात खळबळ निर्माण करेल, अशा खोट्या बातम्या हे दोन्ही पक्ष पसरवित आहे़ अशास्थितीत केवळ धरणे देणारे सरकार हवे की विकास करणारे जबाबदार आणि संवेदनशील सरकार हवे, हे दिल्लीकरांनी ठरवावे, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले़

Web Title: Do not vote for the donors, Modi's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.