भाजपाला मतं देऊ नका ते हिंदू मुख्यमंत्री लादतील - आमदार पीर मन्सूर
By Admin | Updated: November 12, 2014 17:42 IST2014-11-12T17:42:03+5:302014-11-12T17:42:03+5:30
भाजपाला मतं दिलीत तर ते तुमच्यावर हिंदू मुख्यमंत्री लादतील आणि राज्यात जातीय दंगली घडवतील असं वादग्रस्त विधान काश्मीरमधील पब्लिक डेमोक्रेटिक पार्टीचे आमदार पीर मन्सूर यांनी केले आहे.

भाजपाला मतं देऊ नका ते हिंदू मुख्यमंत्री लादतील - आमदार पीर मन्सूर
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १२ - भाजपाला मतं दिलीत तर ते तुमच्यावर हिंदू मुख्यमंत्री लादतील आणि राज्यात जातीय दंगली घडवतील असं वादग्रस्त विधान काश्मीरमधील पब्लिक डेमोक्रेटिक पार्टीचे आमदार पीर मन्सूर यांनी केले आहे. ते उत्तर काश्मीरमधील एका सभेमध्ये बोलत होते. काश्मीर हे मुस्लीमबहूल राज्य असून आमच्या राज्यात मुख्यमंत्री हा मुसलमानच हवा असं विधानही त्यांनी केलं आहे. मन्सूर यांच्या वक्तव्याबद्दल भाजपाने आक्षेप नोंदवला असून निवडणूक आयोगाकडे पीर यांच्या वक्तव्याबद्दल कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. तसेच मन्सुर यांचे वक्तव्य हे देशाच्या एकतेला विघातक असल्याचेही भाजपाने म्हटले आहे.
येत्या निवडणुकांमध्ये पीडिपी आणि भाजपा यांच्यामध्ये चुरस असेल, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसपक्षाला मत देणं व्यर्थ असेल असं पीडीपीच्या अध्यक्ष महबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. नोव्हेंबरच्या २५ तारखेपासून जम्मु आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत ८७ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. निवडणुकांचा पहिला टप्पा २५ नोव्हेंबर रोजी होणार असून दुसरा टप्पा २ डिसेंबर रोजी होणार आहे. तर, तिसरा चौथा व पाचवा टप्पा अनुक्रमे ९, १४ व २० डिसेंबर रोजी परा पडणार आहे. डिसेंबर महिन्यातील २३ तारखेला पाचही टप्प्यातील मतमोजणी होणार आहे.