'दलाली'सारखे शब्द वापरू नका, राहुल गांधींवर बरसले केजरीवाल

By Admin | Updated: October 7, 2016 13:30 IST2016-10-07T13:26:04+5:302016-10-07T13:30:56+5:30

राहुल गांधी यांनी दलालीसारख्या शब्दांचा वापर करू नये, असं सांगत केजरीवाल राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.

Do not use words like 'brokerage', Kejriwal says on Rahul Gandhi | 'दलाली'सारखे शब्द वापरू नका, राहुल गांधींवर बरसले केजरीवाल

'दलाली'सारखे शब्द वापरू नका, राहुल गांधींवर बरसले केजरीवाल

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.7 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'पंतप्रधान नरेंद्र मोदीं'संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. 'राहुल गांधी यांनी दलालीसारख्या शब्दांचा वापर करू नये, राजकीय मतभेद दूर करुन सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावर आपल्याला लष्करातील जवानांसोबत उभे राहणे गरजेचं आहे', असं सांगत केजरीवाल राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. 'पंतप्रधान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जे काही पाऊल उचलत आहेत, त्यासाठी त्यांच्या बाजूने उभे राहणे गरजे आहे', असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
 

आणखी बातम्या
 
राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राईकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत 'केंद्रातील भाजप सरकार हे जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे', असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन राहुल गांधींवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान,यावर राहुल यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. 'माझा सर्जिकल स्ट्राईकला पूर्णपणे पाठिंबा आहे. मी आधीच हे स्पष्ट केले आहे. पण राजकीय पोस्टर्स भारतीय लष्कराचा वापर करण्याला माझा पाठिंबा नाही. अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याला माझा पूर्ण विरोध आहे', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 
 
 

Web Title: Do not use words like 'brokerage', Kejriwal says on Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.