राष्ट्रगीताच्यावेळी चित्रपटगृहात उभे राहून देशभक्ती दाखवावी, असे वाटत नाही : प्रकाश राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 18:37 IST2017-11-12T18:27:23+5:302017-11-12T18:37:54+5:30

नवी दिल्ली : राष्ट्रगीताच्या वेळी चित्रपटगृहात उभे राहून आपल्या देशभक्तीचा देखावा दाखवावा, असे मला वाटत नाही, असे मत अभिनेते प्रकाश राज यांनी रविवारी व्यक्त केले. चित्रपटगृहातील राष्ट्रगीताच्या सक्तीबरोबरच अभिनेते राजकारणात जाणार असल्याच्या चर्चेवरही आपले मत व्यक्त केले. अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश करणे, मला आवडत नाही, असे ते म्हणाले.

Do not think of patriotism by standing in the theaters during the national anthem: Prakash Raj | राष्ट्रगीताच्यावेळी चित्रपटगृहात उभे राहून देशभक्ती दाखवावी, असे वाटत नाही : प्रकाश राज

राष्ट्रगीताच्यावेळी चित्रपटगृहात उभे राहून देशभक्ती दाखवावी, असे वाटत नाही : प्रकाश राज

ठळक मुद्देअभिनेत्यांनी राजकारणात जाऊन नेते होणे देशासाठी घातक राजकारणात जाण्यात रस नाहीरजनीकांत आणि कमल हसन यांच्या नावांचा उल्लेख न करता टीका

नवी दिल्ली : राष्ट्रगीताच्या वेळी चित्रपटगृहात उभे राहून आपल्या देशभक्तीचा देखावा दाखवावा, असे मला वाटत नाही, असे मत अभिनेते प्रकाश राज यांनी रविवारी व्यक्त केले.


चित्रपटगृहातील राष्ट्रगीताच्या सक्तीबरोबरच त्यांनी रजनीकांत, कमल हसन हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते राजकारणात जाणार असल्याच्या चर्चेवरही आपले मत व्यक्त केले. अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश करणे, मला आवडत नाही, असे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच प्रकाश राज यांनी नोटाबंदीवरुन मोदींवर टीका केली होती, तर ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणाऱ्या प्रकाश राज यांनी अभिनेत्यांनी राजकारणात जाऊन नेते होणे देशासाठी घातक आहे, असे मत आज ट्विटरवरुन व्यक्त केले आहे.

राजकारणात जाण्यात रस नसल्याचेही सांगत त्यांनी अभिनेत्यांचा स्वत:चा असा फॅन असतो. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या जबाबदारीबद्दल जागरुक रहायला हवे, असेही रजनीकांत आणि कमल हसन यांच्या नावांचा उल्लेख न करता त्यांनी सुनावले. अभिनेते आणि राजकारण याबद्दल प्रकाश राज यांनी आपली मते स्पष्ट केली. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असे सांगत त्यांनी अभिनेत्यांनी नेते होणे देशासाठी घातक आहे, असे मत व्यक्त केले.

Web Title: Do not think of patriotism by standing in the theaters during the national anthem: Prakash Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.