शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

'काकाला मंत्रीपद दिलंत तर...' चिराग पासवान यांचा थेट पंतप्रधान मोदींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 5:15 PM

Chirag Paswan on Modi cabinet expansion: माझ्या परवानगीशिवाय पक्षाच्या कोट्यातून मंत्रीपद देणे योग्य नाही-चिराग पासवान

ठळक मुद्देनितीश कुमारांचे सरकार दिड-दोन वर्षांपेक्षा जास्त टिकणार नाहीमंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिली फुट जेडीयूमध्ये पडणार

पटणा: लोक जनशक्ती पार्टी (LJP) चे नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले. चिराग यांनी पाटण्यात पत्रकार परिषद घेऊन लोक जनशक्ती पार्टीतून हकालपट्टी केलेले खासदार पशुपती पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच, त्यांना मंत्रीमंडळात घेतल्यावर कोर्टात जाण्याचाही इशारा दिला. पशुपती पारस राम विलास पासवान यांचे भाऊ आणि चिराग पासवान यांचे काका आहेत.

चिराग यांना आशा- मोदी असे करणार नाहीतचिराग पासवान पुढे म्हणाले की, लोजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे. माझ्या परवानगीशिवाय पक्षाच्या कोट्यातून कोणालाही मंत्रीपद देणे योग्य नाही. तसेच, रामविलास पासवान यांच्यां विचारांना पायदळी तुडवत वेगळा गट स्थापन केलेल्या सदस्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. निवडणूक आयोगालाही याची माहिती देण्यात आल्याचेही चिराग यांनी सांगितले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना मंत्रीमंडळात घेणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. पण, असे झाल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. 

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिली फुट जेडीयूमध्ये चिराग पासवान पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वात आधी जनता दल यूनायटेड (JDU) मध्ये फुट पडेल. नितीश कुमारांचे सरकार दिड-दोन वर्षांपेक्षा जास्त चालणार नाही. शिवाय, खासदार पशुपती पारस यांना मंत्रीमंडळात घ्यायचे असेल तर जेडीयूमध्ये सामील करुन घ्या आणि मंत्रीमंडळात स्थान द्या, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार