शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाचा राग संसदेत काढू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधी पक्षांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 06:36 IST

सर्व सदस्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करून विधेयकांवर सखोल चर्चा करावी, चर्चा झाली नाही तर देश चांगल्या सूचनांना मुकतो.

नवी दिल्ली : चार राज्यांच्या निकालानंतर सोमवारी सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनावर त्याचे सावट दिसले. तत्पूर्वी पंतप्रधानांनी सोमवारी विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाचा राग संसदेत काढू नका, नकारात्मकता मागे टाकून पुढे जा, तसे केल्यास त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलू शकेल, असे आवाहन केले. 

हिवाळी अधिवेशनापूर्वी संसद भवनाबाहेर बोलताना ते म्हणाले, लोकांच्या आकांक्षा आणि विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी हे लोकशाहीचे मंदिर एक अतिशय महत्त्वाचे व्यासपीठ आहे, सर्व सदस्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करून विधेयकांवर सखोल चर्चा करावी, चर्चा झाली नाही तर देश चांगल्या सूचनांना मुकतो.

बार बार मोदी सरकार...विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाने उत्साही झालेल्या पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. पंतप्रधान मोदी सभागृहात दाखल झाल्यानंतर भाजपचे सदस्य आणि काही सरकारी मंत्री आपापल्या जागी उभे राहिले आणि ‘बार बार मोदी सरकार, तिसरी बार मोदी सरकार’ आणि ‘एक गॅरंटी, मोदी की गॅरंटी’ अशा घोषणा दिल्या. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा