शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

मोठ्या राजकीय देणग्या रोखीने देऊ नका! प्राप्तिकर विभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:21 AM

राजकीय पक्षांना २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोखीने देऊ नका, असा इशारा प्राप्तिकर विभागाने नागरिकांना दिला आहे. राजकीय पक्षांना मिळणा-या देणग्यांत अधिक पारदर्शकता यावी, यासाठी हा इशारा जारी देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : राजकीय पक्षांना २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोखीने देऊ नका, असा इशारा प्राप्तिकर विभागाने नागरिकांना दिला आहे. राजकीय पक्षांना मिळणा-या देणग्यांत अधिक पारदर्शकता यावी, यासाठी हा इशारा जारी देण्यात आला आहे.राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी ‘इलेक्टोरल बाँड’ अर्थात निवडणूक रोख्यांची योजना सरकारने नुकतीच घोषित केली आहे. स्टेट बँकेच्या विशिष्ट शाखांमधून हे रोखे खरेदी करून नागरिकांना ते राजकीय पक्षांना देता येईल. या योजनेनुसारच २ हजारांपेक्षा जास्तीची रक्कम राजकीय पक्षांना रोखीच्या स्वरूपात देणगीदाखल देता येत नाही.प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, नोंदणीकृत ट्रस्ट व राजकीय पक्ष यांना २ हजारांपेक्षा जास्तीची रक्कम रोख स्वरूपात देणगीदाखल कोणीही देऊ नये. केंद्रीय थेट कर बोर्डाच्या वतीने त्याची जाहिरात जारी दिली. विशेष म्हणजे, विभागाने पहिल्यांदाच राजकीय देणग्यांबाबत जाहीरपणे सूचना केली आहे.सरकारने जारी केलेल्या इलेक्टोरल बाँडस् योजनेच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने नवे नियम जारी केले आहेत. काय करू नये, यासंबंधीच्या आणखी काही सूचना या संदर्भात विभागाने जारी केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, एकाच व्यक्तीकडून एकाच दिवसात २ लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारू नका. एकाच कारणासाठी वेगवेगळे व्यवहार दाखवूनही अशी रक्कम कोणाला स्वीकारता येणार नाही. अचल संपत्तीच्या व्यवहारात २0 हजारांपेक्षा जास्तीची रक्कम रोखीने देता अथवा स्वीकारता येणार नाही. व्यवसायाशी संबंधित व्यवहारात १0 हजारांपेक्षा जास्तीची रक्कम रोखीने देता येणार नाही....तर दंड भरावा लागेलअशा प्रकारच्या रोखीच्या व्यवहारांना आता लोकांनी स्वत:हूनच ‘नाही’ म्हटले पाहिजे. प्राप्तिकर विभागाने ठरवून दिलेल्या या मर्यादांचा भंग केल्यास कर अथवा दंड लागू शकतो. ‘विना रोखीचे व्यवहार करा, स्वच्छ राहा’ असा संदेश या जाहिरातीत देण्यात आला आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स