दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना सोडणार नाही - मोदी
By Admin | Updated: October 12, 2016 09:05 IST2016-10-11T19:41:26+5:302016-10-12T09:05:31+5:30
जे लोक दहशतवाद्यांना मदत करतात त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तावर दिला.

दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना सोडणार नाही - मोदी
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 11 - जातिवाद, वंशवाद आणि सांप्रदायिकता हाच रावणाचा चेहरा आहे. हे संपवल्याशिवाय भारत एकसंघ होऊ शकत नाही तर दहशतवाद संपविल्याशिवाय मानवतावादाचे संरक्षण अशक्य अहे. जे लोक दहशतवाद्यांना मदत करतात त्यांना आम्ही सोडणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला. लखनऊ येथील रामलीला कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
माझं भाग्य आहे की, मला प्राचीन रामलीला कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. कधी कधी युद्ध करणे हा शेवटाचा उपाय ठरतो. आम्ही युद्धाकडून बुद्धाकडे जाणारे आहोत, असंही ते म्हणाले.
एशबाग येथील सभेत बोलताना बेटी बचाव मोहिमेबद्दल बोलताना मोदी म्हणाले, आपल्या घरात मुलगा जन्माला आल्यावर आपण जेवढा आनंद व्यक्त करतो तेवढाच आनंद मुलगी झाल्यावर देखील करावा. आपण आज विजयादशमीचा सण साजरा करत आहोत, पण सगळ जग गर्ल चाइल्ड डे दिवस साजरा करत आहे.