शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बैठकांतील चर्चेची माहिती बाहेर जाऊ देऊ नका; काँग्रेस नेतृत्वाच्या नेत्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 06:28 IST

काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या बैठकांमध्ये लोकशाही पद्धतीने चर्चा होते. प्रत्येक जण आपल्या कल्पना, तक्रारी बैठकीत मांडत असतो. पण निर्णय सामूहिक विचारांतूनच होतो. त्यामुळे बैठकीत जे बोलले जाते, त्याची माहिती कोणीही बाहेर जाऊ देऊ नये, अशा सूचना काँग्रेसने सर्व नेत्यांना दिल्या आहेत. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.काँग्रेस कार्यकारिणीच्या २५ मे रोजी झालेल्या बैठकीत कमलनाथ, अशोक गेहलोत व पी. चिदम्बरम आपल्या मुलांना उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते, असे तक्रारवजा उद्गार राहुल गांधी यांनी काढल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी नेत्यांना या सूचना दिल्या आहेत. तसेच अफवा, अंदाज व अर्धवट माहिती याआधारे बातम्या देण्याचे माध्यमांनीही टाळावे. बंद दाराआड होणाऱ्या बैठकांचे जे महत्त्व असते, ते सर्वांनी पाळायला हवे, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे.प्रवक्त्याचे हे म्हणणे ही राहुल गांधी यांची भूमिका असल्याचे मानले जात आहे. पराभवानंतर कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यासंबंधी काही माध्यमांत आलेल्या बातम्या अनावश्यक तसेच अफवा वा अंदाजांच्या आधारे होत्या, असे सूरजेवाला यांनी म्हटले आहे. निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे काँग्रेसला संघटनेत मोठे फेरबदल करण्याची व चुका दुरुस्त करण्याची संधी आहे. त्याचे सर्वाधिकार कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत, असेही सूरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.>प्रदेशाध्यक्षांचे राजीनामेनिवडणुकांत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊ न पंजाब, आसाम व झारखंड प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी सोमवारी आपले राजीनामे पक्षाध्यक्षांना सादर केले. आतापर्यंत १३ प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस