पर्वणीला गोदावरीत अतिरिक्त पाणी सोडू नका

By Admin | Updated: September 11, 2015 21:25 IST2015-09-11T21:25:00+5:302015-09-11T21:25:00+5:30

Do not leave excess water in the Godavari for the mountain | पर्वणीला गोदावरीत अतिरिक्त पाणी सोडू नका

पर्वणीला गोदावरीत अतिरिक्त पाणी सोडू नका

>न्यायालयात याचिका : राज्य सरकारला प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश
मुंबई : राज्यात पावसाअभावी पाणी टंचाईमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्वणीच्या काळात शाही स्नानासाठी गोदावरीत अतिरिक्त पाणी सोडण्यास मनाई करावी, अशी मागणी एका जनहित याचिकेद्वारे न्यायालयात करण्यात आली आहे.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. एच. एम. देसरडा यांनी ही याचिका दाखल केली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. काही ठिकाणी भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शाही स्नानासाठी अतिरिक्त पाणी सोडणे योग्य नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. ही याचिका दाखल होण्यास उशीर झाला आहे. मात्र तरीही सरकारचे म्हणणे ऐकून पुढील आदेश दिले जातील, असे नमूद करत न्यायालयाने शासनाला प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले. याचिकेवरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Do not leave excess water in the Godavari for the mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.