शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विचारस्वातंत्र्य गहाण ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 3:30 AM

‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे

प्रज्ञा केळकर-सिंग ।महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : ‘‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग दुसºयाला नाही का... एखादी कलाकृती आवडली नाही म्हणून विरोध करण्यासाठी चार दगड मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला,’’ असा थेट सवाल करत, लोकांसमोर सकारात्मक इतिहास मांडा, विचारस्वातंत्र्य कोणाच्याही चरणी वाहू नका, नम्रतेने चिकित्सा करा, प्रश्न विचारा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी समाजाला उद्देशून दिलाधर्म, शासन, झुंडशाही आणि लेखक स्वत: हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चार शत्रू आहेत. यातून बाहेर पडून नवा इतिहास घडवायचा असेल, तर उदारमतवादाची कास धरली पाहिजे, असे चपळगावकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारचा वाढता हस्तक्षेप, दुर्मिळ होत चाललेले विचारवंत, मातृभाषेचा वाढत चाललेला न्यूनगंड, लेखकांच्या वाढत्या राजकीय, आर्थिक महत्त्वाकांक्षा अशा विविध मुद्द्यांना त्यांनी निर्भीडपणे स्पर्श केला.डॉ. सुधीर रसाळ आणि प्रशांत दीक्षित यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. चपळगावकर म्हणाले, ‘‘इंग्रजीच्या प्रतिष्ठेची चुकीची कल्पना हे मातृभाषेच्या न्यूनगंडाचे प्रमुख कारण आहे. इंग्रजी शाळांमध्ये चांगली पुस्तके, सुविधा मिळतात, त्या मराठी शाळेत मिळत नाहीत, असा समज आहे. मराठीची श्रीमंती वाढवायची असेल तर अभिजात दर्जाचा आग्रह धरतानाच नवे ज्ञान निर्माण करणे, व्यवहारात मराठीचा वापर वाढणे आणि अनुदान केंद्रे उभी राहणे गरजेचे आहे. बोलीभाषा टिकवणे, मराठी समृद्ध करणे, मुलांना वाचनाची गोडी लावणे, ही सध्याची महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत.’’ ‘‘आपल्याकडे आलिशान घरे, महागड्या वस्तू, अद्ययावत सोयीसुविधा असतात. मात्र, घरात पुस्तके, विश्वकोशाचे खंड नाहीत, याची आपल्याला लाज वाटत नाही. भाषेचा वारसा टिकवणे हे व्यापक माध्यमवर्गाचे कर्तव्य आहे,’’ हे त्यांनी नमूद केले. लेखकाचे स्वातंत्र्य टिकायचे असेल तर राजकीय आणि आर्थिक महत्त्वकांक्षा बाळगणे चुकीचे आहे. यामुळे धाडसाने मते मांडणारे लेखक , विचारवंत दुर्मिळ होत आहेत. सरकार विचारवंतांना दावणीला बांधु पाहत आहे.सर्जनाची कुंडली मांडता येत नाही. समाजात चांगले घडते, तेव्हा लेखकांना चैतन्य मिळते.वाड्मयात नवनिर्मिती झाली पाहिजे.उठसूट तलवारी हातात घेतात, त्यामागे विचार नसतो. समाजातील दोन घटकांमध्ये फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वायत्त संस्थांमधील हस्तक्षेप वाढला आहे.सत्ताधाºयांनी विचारवंतांची भूक बाळगली पाहिजे.सरकार केवळ समित्या नेमते, समित्यांनी वेगाने काम करावे, असे त्यांना वाटत नसते.इंटरनेट माहिती उपलब्ध असते, ज्ञान नाही. ज्ञान भारतीय भाषेमध्ये निर्माण होते.अनुवादाच्या माध्यमातून मराठी वाड्मयला जागतिक दर्जा मिळेल.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन