ड्युटीला गेलेले शिपाई परतलेच नाही
By admin | Updated: May 30, 2016 00:36 IST
जळगाव: क्रय विक्रय संघात शिपाई म्हणून नोकरीस असलेले मोहन प्रल्हाद खडके (वय ५४ रा.विठ्ठल पेठ, जळगाव) हे नेहमीप्रमाणे २५ मे रोजी ड्युटीला गेले, मात्र ते संध्याकाळी परतलेच नाहीत. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, खडके यांना अर्धांगवायुचा त्रास असून आईच्या निधनामुळे त्यांची स्मृतीभ्रंश होते. २५ मे रोजी घरी न आल्याने संध्याकाळी मुलगा निखिल खडके यांनी त्यांना फोन केला असता लागला नाही तर कार्यालयात व्यवस्थापकांना विचारले असता ते सकाळीच परत गेल्याचे सांगण्यात आले होते.
ड्युटीला गेलेले शिपाई परतलेच नाही
जळगाव: क्रय विक्रय संघात शिपाई म्हणून नोकरीस असलेले मोहन प्रल्हाद खडके (वय ५४ रा.विठ्ठल पेठ, जळगाव) हे नेहमीप्रमाणे २५ मे रोजी ड्युटीला गेले, मात्र ते संध्याकाळी परतलेच नाहीत. याप्रकरणी शनी पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, खडके यांना अर्धांगवायुचा त्रास असून आईच्या निधनामुळे त्यांची स्मृतीभ्रंश होते. २५ मे रोजी घरी न आल्याने संध्याकाळी मुलगा निखिल खडके यांनी त्यांना फोन केला असता लागला नाही तर कार्यालयात व्यवस्थापकांना विचारले असता ते सकाळीच परत गेल्याचे सांगण्यात आले होते.फोटो..