शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

धर्मांतराला राजकीय रंग देऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले, पुढील सुनावणी ७ फेब्रुवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 06:06 IST

फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याबाबत केंद्र आणि राज्यांना निर्देश देण्याची विनंती ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी याचिकेद्वारे केली.

नवी दिल्ली : धर्मांतर ही गंभीर समस्या आहे, याला राजकीय रंग देऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावले. या प्रकरणाची ७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याबाबत केंद्र आणि राज्यांना निर्देश देण्याची विनंती ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी याचिकेद्वारे केली. यावर न्यायालय सुनावणी करत होते. याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित असून, राज्यात अशा धर्मांतराचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तामिळनाडूतर्फे ज्येष्ठ वकील पी. विल्सन यांनी ठामपणे म्हणाले.‘न्यायालयीन कामकाज भरकटवू नका. तुमच्या राज्यात असे घडत असेल तर ते वाईट आहे. एका राज्याला लक्ष्य करण्यात येत आहे, अशा दृष्टीने पाहू नका. राजकीय बनवू नका,’ असे न्यायालयाने सुनावले.

याचिकेत काय म्हटले?

सक्तीचे धर्मांतर ही एक देशव्यापी समस्या आहे, ज्यावर त्वरित उपाय करणे आवश्यक आहे. नागरिकांना होणारी जखम खूप मोठी आहे कारण असा एकही जिल्हा नाही जो धर्मांतरमुक्त आहे. देशभर दर आठवड्याला फसवे धर्मांतर केले जाते; परंतु केंद्र आणि राज्यांनी हा धोका रोखण्यासाठी कठोर पावले उचलली नाहीत. फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधेयक तयार करण्याचे निर्देश द्यावेत.

महाधिवक्त्यांची मदत हवी...

धमकावणे, भेटवस्तू आणि आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांवर आळा घालावा, यासंदर्भातील याचिकेत ‘न्यायालयाचे मित्र’ (ॲमॅकस क्युरी) म्हणून हजर व्हावे, अशी सूचना न्यायमूर्ती एम.आर. शाह आणि सी.टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने वेंकटरमानी यांना केली. बळजबरीने, प्रलोभन इ. मार्गांनी धर्मांतर होत आहे का, त्यावर उपाय काय आहेत? याबद्दल वेंकटरमानी यांनी माहिती द्यावी, असे खंडपीठाने सांगितले.

मुद्दा एका राज्याचा नाही

धर्मांतर हा मुद्दा काही एका राज्याचा नाही, तर आम्हाला संपूर्ण देशाची चिंता आहे. एका राज्यापुरता हा प्रश्न ठेवता येणार नाही. याला राजकीय रंग देऊ नये. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतPoliticsराजकारण