‘विमानतळासाठी जमीन देऊनही केंद्र होकार देईना’
By Admin | Updated: August 19, 2015 22:46 IST2015-08-19T22:46:14+5:302015-08-19T22:46:14+5:30
ताजमहाल’साठी जगप्रसिद्ध असलेल्या आग्रा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जमीन देण्याची तयारी दाखवूनही

‘विमानतळासाठी जमीन देऊनही केंद्र होकार देईना’
लखनौ : ‘ताजमहाल’साठी जगप्रसिद्ध असलेल्या आग्रा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जमीन देण्याची तयारी दाखवूनही केंद्र सरकारकडून मात्र मंजुरी मिळत नाही, असे उत्तर प्रदेशचे पर्यटनमंत्री ओमप्रकाश सिंग यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
बसपा सदस्य धरमपाल सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना ओमप्रकाश सिंग यांनी ही माहिती दिली. (वृत्तसंस्था)