ेेस्थानिकांचा संभ्रम अजून मिटेना

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:18+5:302015-02-18T00:13:18+5:30

पेडणे बसस्थानक कामास गती

Do not forget the confusion of space station | ेेस्थानिकांचा संभ्रम अजून मिटेना

ेेस्थानिकांचा संभ्रम अजून मिटेना

डणे बसस्थानक कामास गती
पेडणे : अनेक वर्षांपासून रखडलेल्या नियोजित बसस्थानकाला सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्या प्रयत्नामुळे गती मिळालेली आहे. सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून नियोजनबध्द मार्केट प्रकल्प व बस स्थानक, पार्किंग व्यवस्था उभारण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत या बसस्थानकाचे काम पूर्ण करण्याची ग्वाही कंत्राटदाराने दिलेली आहे.
पेडणे येथील बसस्थानकाचा प्रश्न मागील २५ वर्षापासून गाजत होता. पेडणे शहरात कोणतेच प्रकल्प होणार नाही का? असा संशय निर्माण होत असताच विद्यमान सरकारने सर्वात प्रथम या बसस्थानकाकडे लक्ष देऊन काम मार्गी लावले.
पेडणे येथे पोर्तुगीज राजवटीमधील जुने बसस्थानक आहे. त्याचा वापर टॅक्सी स्टॅण्ड म्हणून केला जातो. हे बस स्थानक लहान आहे. मात्र, काळानुसार वाहनांच्या संख्यामध्ये वाढ होत गेली. त्यामुळे जागा अपुरी पडायला लागली. अरुंद रस्त्यामुळे व वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे बसस्थानकात बसगाड्या आत वळवून घेण्यास त्रासदायक बनले आहे. सध्या या जागेचा उपगोय टॅक्सी पिकअप, पायलट व खासगी वाहने पार्क करण्यासाठी केला जात आहे.
पेडणे शहरात बस स्थानक नसल्याने सर्व प्रकारची प्रवासी वाहने मुख्य रस्त्यावर थांबवली जातात. प्रवासी बसगाड्या जास्त वेळ रस्त्यावर थांबून प्रवाशांना घेतात. तसेच आपली जाण्याची वेळ झाल्यावरच ती वाहने सुटतात. तोपर्यंत प्रवासी बसगाड्या मुख्य रस्त्यावर जागा अडवून थांबतात.
कोरगांव, हरमल, केरी या बाजूने जाणार्‍या बस गाड्या भगवती मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर थांबतात. पत्रादेवी, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला येथे जाणार्‍या बसगाड्या सेट्ल बँक ऑफ इंडिया या मुख्य रस्त्यावर थांबतात. तर म्हपसा, पणजी, मांदे्र, मोरजी बस गाड्या बस स्थानकावर थांबतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत अधिक भर पडते. बस स्थानक नसल्याने प्रवाशांना उन्हाळयात, पावसात शेजारच्या हॉटेल, दुकांनाचा आसरा घ्यावा लागतो.
दरम्यान, १९८९ साली पेडणेचे माजी नगराध्यक्ष परशुराम कोटकर यांच्या काळात बस स्थानक बांधण्यासाठी कदंब महामंडळला प्रयत्न केले.
सरकारने १९९२ साली बसस्थानक संबंधी आवश्यक अभ्यास करून बस स्थानकांसाठी प्रशस्त जागेचे भूसंपादन केले. या नियोजित कंदब बस स्थानकाची पायाभरणी झाली. पेडण्याचे माजी आमदार शंकर साळगांवकर, धारगळचे माजी आमदार देऊ मंदे्रकर, माजी नगराध्यक्ष परशुराम काटेकर यांच्या उपस्थितीत पायाभरणी झाली. परंतु माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते बसविण्यात आलेला नामफलक त्याच दिवशी कदंब महामंडळाने काढून टाकला.
माजी आमदार परशुराम कोटकर यांनी हा प्रश्न अनेकवेळा विधानसभेत उपस्थित केला. कदंब महामंडळही जबघाईत आल्याने ४५ लाखांचा बस स्थानक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविण्यात आला. यानंतर आवश्यक निधी नसल्याचे कारण सांगण्यात आले होते. या बस स्थानकावर अनेकदा राजकारण करण्यात आले. मंत्री व आमदारांनी प्रत्येकवेळा आपल्या जाहीर नाम्यात बस स्थानकाचा प्रश्न अग्रस्थानी ठेवला. परंतु कार्यवाही झाली नाही. मात्र, विद्यमान आमदार रादेंद्र आर्लेकर यांनी गांर्भीयाने बस स्थानकाचा प्रश्न सरकार दरबारी उचलून धरला. तसेच बस स्थानक पूर्ण झाल्यावर शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पेडणे शहराला अविकसित म्हणून लागलेला ठपका काहीसा दुर होणार यात शंका नाही. (प्रतिनिधी)
फोटो ओळी : पेडणे येथील नियोजित बस स्थानकाचे काम व आराखडा. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

Web Title: Do not forget the confusion of space station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.