सावईवेरेत वेळेचा नियम न पाळणा

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:14+5:302015-07-16T15:56:14+5:30

रा रेतीवाहू ट्रक अडवला

Do not follow the rules of time | सावईवेरेत वेळेचा नियम न पाळणा

सावईवेरेत वेळेचा नियम न पाळणा

रेतीवाहू ट्रक अडवला
फोंडा-
आमोणाहून सावईवेरेमार्गे सावर्डेला रेती घेऊन जाणारा ट्रक आज सावईवेरेतील युवकांनी वेळेचे बंधन न पाळल्यामुळे अडवला. संध्याकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत या भागातून रेती वाहतूक करण्यास स्थानिकांची हरकत असून आज अडवलेला ट्रक संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास आला होता. गेल्या रविवारीही सवईवेरेतील युवकांनी वेळेचे बंधन न पाळणारे दोन ट्रक अडवून त्यातील रेती उतरवून घेतली होती. यापुढेही कोणत्याही परिस्थितीत वेळेचे बंधन न पाळणार्‍या ट्रकांना या भागातून रेती वाहतूक करू दिली जाणार नसल्याचे दिनेश नाईक या युवकाने सांगितले.
गेल्या रविवारपासून रेती वाहतूकीतील बेजबाबदारपणाबाबत सावईवेरेतील युवक आक्रमक बनले असून रेती वाहतूक करणार्‍या ट्रकचालकांनी वेग मर्यादा तसेच वाहतूकीसाठी निर्धारीत केलेल्या वेळा पाळण्याचे आवाहन या युवकांनी केले आहे.
(प्रतिनिधी)


Web Title: Do not follow the rules of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.