येणारी लक्ष्मी नाकारु नका - गडकरींचे वादग्रस्त विधान
By Admin | Updated: October 5, 2014 19:50 IST2014-10-05T19:26:46+5:302014-10-05T19:50:53+5:30
हरामाचा पैसा गरींबाकडे येण्याची हीच योग्य वेळ असल्याने येणारी लक्ष्मी नाकारु नका असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.

येणारी लक्ष्मी नाकारु नका - गडकरींचे वादग्रस्त विधान
>ऑनलाइन लोकमत
निलंगा (लातूर), दि. ५ - राज्याच विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगला असतानाच भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निलंगा येथील सभेत मतदारांना पैसे घेण्यासाठी प्रोत्साहन देणारे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. हरामाचा पैसा गरींबाकडे येण्याची हीच योग्य वेळ असल्याने येणारी लक्ष्मी नाकारु नका असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.
लातूरमधील निलंगा येथे रविवारी नितीन गडकरी यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. 'येत्या १० दिवसांमध्ये तुम्हाला 'लक्ष्मी दर्शनाचा' योग असून खास लोकांना विदेशी तर चिल्लर नेत्यांना विदेशी दिली जात आहे. पाच - पाच हजार रुपयांचे वाटप सुरु असून ताई - माई - अक्कांना लुंगडी तर तरुणांना पँटशर्ट दिले जाईल. तुम्हाला खायचयं ते खा, प्यायचंय ते प्या, हरामाचा माल गरीबांकडे जाण्याची हीच योग्य वेळ असल्याने येणा-या लक्ष्मीला नाही म्हणू नका' असे गडकरी यांनी प्रचारसभेत सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर टीका करतानाही गडकरींची जीभ घसरली होती. मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक असताना मतदारांना पैसे घेण्यासाठी प्रोत्साहन देणारे विधान गडकरींचा चांगलेच महागात पडू शकते.