लक्ष्मणरेषा ओलांडू नका

By Admin | Updated: December 17, 2014 03:12 IST2014-12-17T03:12:30+5:302014-12-17T03:12:30+5:30

काही भाजपा खासदारांची वादग्रस्त वक्तव्ये अंगलट आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी वादग्रस्त विधाने करणाऱ्या खासदारांना ‘लक्ष्मणरेषा ओलांडू नका’

Do not cross the linear line | लक्ष्मणरेषा ओलांडू नका

लक्ष्मणरेषा ओलांडू नका

नवी दिल्ली : काही भाजपा खासदारांची वादग्रस्त वक्तव्ये अंगलट आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी वादग्रस्त विधाने करणाऱ्या खासदारांना ‘लक्ष्मणरेषा ओलांडू नका’ अशा शब्दांत तंबी दिली आहे़ सुशासन आणि विकासाच्या मुद्द्यावर पक्ष भरकटलेला नाही, ना कुणाला भरकटू देईल, असेही मोदींनी म्हटले़
भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी अलीकडे महात्मा गांधी यांचा हत्यारा नथुराम गोडसे याला ‘राष्ट्रभक्त’ संबोधले होते़ त्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत जोरदार गोंधळ उडाला होता़
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री साध्वी निरांजन ज्योती यांनीही दिल्लीतील एका सभेत असेच वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला होता़ याशिवाय धर्मांतरणाच्या मुद्द्यावरही भाजपाच्या काही खासदारांनी वाद ओढवून घेणारी वक्तव्ये केली होती़ यामुळे विरोधकांना हाती आयते कोलीत मिळाले होते़
या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी पक्ष खासदारांना कठोर शब्दांत समज दिल्याचे सूत्रांनी सांगितले़ सरकारने विकासाचा अजेंडा सोडता कामा नये़ प्रत्यक्ष काम दिसेल असे काही करा, असे मोदींनी पक्ष खासदारांना बजावले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Do not cross the linear line