प्रजासत्ताकदिनी वाईन महोत्सव नको

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30

प्रजासत्ताकदिनी वाईन महोत्सव नको

Do not celebrate the Republic Day Wine Festival | प्रजासत्ताकदिनी वाईन महोत्सव नको

प्रजासत्ताकदिनी वाईन महोत्सव नको

रजासत्ताकदिनी वाईन महोत्सव नको
कांपाल उत्सव अडचणीत : राष्ट्रीय हरित लवादचा आदेश
पणजी : कांपाल येथे २६ जानेवारी रोजी होणार्‍या वाइन महोत्सव आयोजनावर राष्ट्रीय हरित लवादाने आक्षेप घेतल्याने हा उत्सव अडचणीत आला आहे. गोवा किनारप˜ी व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी देऊ नये, असा आदेश देताना सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत.
कांपाल फुटबॉल मैदानावर चार दिवसीय वाईन महोत्सव शुक्रवारी सुरु झाला. २६ जानवोरीला या महोत्सवाचा समारोप होणार आहे़ मात्र, लवादाच्या आदेशामुळे २६ रोजी महोत्सवाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. तेथे सीआरझेड परवानगी आवश्यक असतानाही आयोजकांनी ती घेतलेली नाही, तसेच प्रजासत्ताकदिनी येथे वाइन विकली जाणार असल्याचे आरटीआय कार्यकर्त्याने हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिले होते. लवादाच्या पुणे येथील पश्चिम विभाग खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. आर. किणगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्यासमोर ही याचिका शुक्रवारी सुनावणीस आली असता, प्रजासत्ताकदिनी केवळ कांपाल येथेच नव्हे तर राज्यातील किनार्‍यांवर किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी अशा महोत्सवांना परवानगी देऊ नये, असे लवादाने बजावले आहे. (प्रतिनिधी)

चौकट

सरकारचे कान उपटले!
घटनेचा आदर करताना सर्व राज्यांनी सचोटी दाखवली पाहिजे. राज्य सरकार आपल्या मर्जीनुसार धोरणे बदलू शकत नाही, असे लवादाने म्हटले असून पूर्वापार चालत आलेल्या परंपरेच्या नावाखालीही असले उद्योग करू नका, असे खडे बोल सुनावले आहेत. प्रजासत्ताकदिनी मद्यविक्रीला कोणत्याही सार्वजनिक यंत्रणेने परवाना देऊ नये तसेच हा दिवस कोरडा दिन जाहीर करावा, अशी सूचना केली आहे.

कोट

वाईन महोत्सव चालूच राहील. सरकारने कोरडा दिवस जाहीर केला तर प्रजासत्ताकदिनी महोत्सवाच्या ठिकाणी मद्यविक्री होणार नाही.
निखिल देसाई, व्यवस्थापकीय संचालक , पर्यटन विकास महांमडळ

Web Title: Do not celebrate the Republic Day Wine Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.