ध्येय गाठल्याशिवाय शांत बसू नका

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:23+5:302015-01-22T00:07:23+5:30

फोटो आहे....

Do not be silent without reaching goals | ध्येय गाठल्याशिवाय शांत बसू नका

ध्येय गाठल्याशिवाय शांत बसू नका

टो आहे....
ध्येय गाठल्याशिवाय शांत बसू नका
पी. पी. खांडेकर : विविध क्षेत्रातील मान्यवरांना सारथीच्या मानपत्राचे वितरण
नागपूर : सारथी मानपत्र मिळालेल्या पुरस्कारकर्त्यांचे सामाजिक दायित्व वाढले आहे. त्यामुळे पुरस्कार मिळालेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भविष्यात समाजासाठी भरीव कामगिरी करून ध्येय गाठल्याशिवाय शांत बसू नये, असे प्रतिपादन एअर मार्शल पी. पी. खांडेकर यांनी आज येथे केले.
लघु उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्था सारथीच्या कुसुमताई वानखेडे सभागृहातील मानपत्र वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. व्यासपीठावर महालेखाकार कार्यालयाच्या अधिकारी शीला जोग, राजेंद्र राठी, सारथीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वझलवार, ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक, डॉ. मधुकर आपटे, प्रशांत काळे उपस्थित होते. एअर मार्शल पी. पी. खांडेकर म्हणाले, सारथी संस्थेने सागर मंथन करून विदर्भातील रत्नांना शोधून काढले आहे. पुरस्कार विजेत्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. शीला जोग म्हणाल्या, माणूस नवनिर्माण करू शकत नसून पुनर्निर्माण करणे त्याच्या हाती आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुनर्निर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन इतरांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांनी सारथीच्या वाटचालीची माहिती देऊन संस्थेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील श्रीनिधी घटाटे, प्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे, क्रीडा क्षेत्रातील रुचा औरंगाबादकर, संगीत क्षेत्रातील नंदिनी सहस्रबुद्धे, क्रीडा क्षेत्रातील मोना मेश्राम, उद्योग आणि नंदकिशोर सारडा, वाणिज्य क्षेत्रातील सुहास बुद्धे, ग्रामीण विकास, वनीकरण आणि ऊर्जा नुतनीकरण क्षेत्रातील पद्मश्री अच्युत गोखले यांना सारथीच्या मानपत्राचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविकातून मधुकर आपटे यांनी सारथीच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती दिली. डॉ. अनिरुद्ध वझलवार यांनी सारथीच्या मानपत्रामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमात स्वराली संस्थेच्या गायिकांनी पसायदान सादर केले. संचालन स्वाती सुरंगळेकर यांनी केले. आभार ॲड राजेंद्र राठी यांनी मानले.
....................

Web Title: Do not be silent without reaching goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.