धर्माची सांगड दहशतवादाशी घालू नका
By Admin | Updated: November 14, 2014 03:20 IST2014-11-14T02:38:38+5:302014-11-14T03:20:50+5:30
जागतिक समुदायाने धर्म व दहशतवाद यांची सांगड घालू नये व कोणत्याही प्रकारचा दहशतवाद निपटून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय फळी निर्माण केली पाहिजे,

धर्माची सांगड दहशतवादाशी घालू नका
ने पी ताव : जागतिक समुदायाने धर्म व दहशतवाद यांची सांगड घालू नये व कोणत्याही प्रकारचा दहशतवाद निपटून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय फळी निर्माण केली पाहिजे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पूर्व आशिया शिखर परिषदेत आपली भूमिका मांडताना गुरुवारी मोदी म्हणाले, सायबर व अवकाश हे समृद्धीचे स्रोत आहेत, त्यांना संघर्षाचे नवे माध्यम बनवू नये. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह जगातील 18 देशांचे नेते या परिषदेसाठी उपस्थित आहेत.
पूर्व अशिया शिखर परिषदेने इसिसविरोधी ठराव केला आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे; पण त्याचबरोबर दहशतवादाविरोधात एकत्र लढा दिला पाहिजे. दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने एक होऊन लढा दिला पाहिजे.
मानवता हे एकच सूत्र ठेवून एकत्र येण्यावर ज्यांचा विश्वास आहे, त्यांनी धर्म व दहशतवाद यांची सांगड घालू नये, असे मोदी म्हणाले.
दहशतवादाचा धोका वाढला आहे, अमली पदार्थाची तस्करी, शस्त्रस्त्रंची तस्करी व मनी लाँड्रिंगचे धोके वाढत आहेत, असेही मोदी याप्रसंगी म्हणाले.
मोदी - कॅमेरून भेट
लंडन - ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून जी 2क् परिषदेच्या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांतील परस्पर संबंधांच्या अनेक विषयांवर ब्रिस्बेनमध्ये होणा:या बैठकीत चर्चा होईल. कॅमेरून व मोदी यांची ही पहिलीच भेट आहे. (वृत्तसंस्था)
4मेलबर्न - 28 वर्षात प्रथमच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताप्रीत्यर्थ ऑस्ट्रेलियात अनेक नवनवीन कार्यक्रम तयार करण्यात येत असून, मोदी यांच्या दौ:यादरम्यान मोदी एक्स्प्रेस ही खास ट्रेन चालविली जाणार आहे. ऑस्ट्रेलियात मोदी यांचे भाषण ऐकण्याची उत्सुकता असणा:या लोकांना ही ट्रेन मेलबर्नहून सिडनीला घेऊन जाईल.
4येत्या रविवारी ही ट्रेन 22क् प्रवाशांना मेलबर्नहून सिडनीला घेऊन जाईल. भारतीय पंतप्रधानाने सार्वजनिक भाषण देण्याची ऑस्ट्रेलियातील ही पहिली वेळ आहे. मोदी ट्रेनची ही व्यवस्था ओव्हरसीज फ्रेंड ऑफ बीजेपी या संघटनेने केली आहे.