डीएनडी फ्लाय वेवर सामूहिक बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 15, 2017 16:53 IST2017-06-15T16:53:00+5:302017-06-15T16:53:31+5:30

नोएडातल्या सेक्टर 20मध्ये डीएनडी फ्लाय-वेवर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

DND Fly Waver gang rape, FIR against accused | डीएनडी फ्लाय वेवर सामूहिक बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

डीएनडी फ्लाय वेवर सामूहिक बलात्कार, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - नोएडातल्या सेक्टर 20मध्ये डीएनडी फ्लाय-वेवर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर बलात्कार केलेल्या नराधमांनी त्या तरुणीचा मृतदेह रस्त्यावर टाकून पळ काढला आहे. पीडितेला दिल्लीतल्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेला पहिल्यांदा कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिला दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात पाठवण्यात आलं. ही घटना 25 एप्रिल रोजी घडली असून, आज या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नोएडा सेक्टर 20मधल्या पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रल्हाद सिंह यादव म्हणाले, 25 एप्रिल रोजी डीएनडी फ्लाय वेवर ती तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली. त्यानंतर तिला नोएडातल्या कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती आणखी खालावल्यामुळे तिला लोकनायक रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं.

या तरुणीसोबत सामूहिक बलात्कार केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दिल्लीतल्या फिल्म सिटी चौकीतले प्रभारी राजीव कुमार यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पीडितेची मानसिक स्थिती ठीक नाही. पोलीस आरोपींचा कसून तपास करत आहे. 

 

Web Title: DND Fly Waver gang rape, FIR against accused