शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:28 IST

हिंदी भाषावादावरुन द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

MP Kanimozhi on Hindi: देशभरात सुरु असलेल्या भाषावाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेविरोधात दक्षिणेकडील राज्ये एकवटल्यानंतर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आमच्या हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचा आरोप दाक्षिणात्य राज्यांनी केला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नसल्याचे म्हटलं. अमित शाह यांच्या या विधानावर द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तमिळ भाषा देखील कोणाचीही शत्रू नाही, असं खासदार कनिमोळी म्हणाल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच हिंदी ही कोणत्याही भाषेची शत्रू नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरु अससेला भाषेवरील वाद तीव्र झाला आहे. अमित शाह यांनी हिंदी सर्व भारतीय भाषांची मित्र असून देशात कोणत्याही भाषेला विरोध नसल्याचेही म्हटलं होतं. त्यानंतर शनिवारी द्रमुक खासदार कनिमोझी यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर देत उत्तर भारतातील लोकांना तमिळ भाषा शिकण्याचे आवाहन केले. 

"जर हिंदी कोणत्याही भाषेची शत्रू नाही, तर तमिळ देखील कोणत्याही भाषेची शत्रू नाही. त्यांना तमिळ शिकू द्या. उत्तर भारतातील लोकांना किमान एक दक्षिण भारतीय भाषा शिकू द्या. हीच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे. आम्ही कोणाचेही शत्रू नाही आहोत. आम्ही सर्वांचे मित्र आहोत. त्यामुळे आमचीही भाषाही शिका, असं खासदार कनिमोळी करुणानिधी म्हणाल्या.

काय म्हणाले अमित शाह?

"भारताचे विभाजन करण्यासाठी भूतकाळात भाषेचा वापर करण्यात आला आहे, परंतु असे प्रयत्न कधीही यशस्वी झाले नाहीत. मोदी सरकार भारतीय भाषा देशाला एकत्र आणण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम बनतील यासाठी काम करत आहे. हिंदी ही कोणत्याही भारतीय भाषेच्या विरोधात नाही तर ती सर्वांची मैत्रीण आहे. देशात कोणत्याही भारतीय भाषेला विरोध नसावा," असे अमित शाह म्हणाले.

दरम्यान, तामिळनाडूतील मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकार राज्यात हिंदी लादण्याच्या आरोपांवरून केंद्र सरकारला धारेवर धरत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबण्यात येणार असल्यावर तामिळनाडू सरकार याला विरोध करत आहे. अनेकदा केंद्राने धोरण लागू करण्यास नकार दिल्याबद्दल राज्याकडून शिक्षण निधी रोखल्याचा आरोप तामिळनाडू सरकारने केला आहे.

टॅग्स :hindiहिंदीAmit Shahअमित शाह