पाईपलाईन रोडवर रंगली दिवाळी पहाट दिवाळी उत्साहात: स्वरांची उधळण
By Admin | Updated: October 30, 2016 22:46 IST2016-10-30T22:46:39+5:302016-10-30T22:46:39+5:30
अहमदनगर: येथील पाईपलाईन रस्त्यावर आयोजित दिवाळी पहाट चांगलीच रंगली़ पहाटेच्या शांततामय वातावरणात गायकांनी विविध स्वरांची उधळण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले़

पाईपलाईन रोडवर रंगली दिवाळी पहाट दिवाळी उत्साहात: स्वरांची उधळण
अ मदनगर: येथील पाईपलाईन रस्त्यावर आयोजित दिवाळी पहाट चांगलीच रंगली़ पहाटेच्या शांततामय वातावरणात गायकांनी विविध स्वरांची उधळण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले़ दिवाळी पहाटेचे शहरासह उपनगरांत ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते़ पाईपलाईन रस्त्यावर स्वरसुधा येथे दिवाळी पहाट कार्यक्रम पार पडला़ कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र आंधळे व विकास बडे यांच्या वतीने करण्यात आले होते़ स्वर मैफलीच्या सुरुवातीला भक्तीगीते सादर करण्यात आली़ गायक प्रभाकर सुर्यपुजारी यांनी विविध भक्तीगीते सादर केली़ त्यांना सुधाकर पुजारी यांनी साथ केली़ तसेच आंधळे व बडे यांनीही गायकांना साथ केली़ दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पहाटेच्यावेळी गायकांनी गीत सादर करत दिवाळीचे स्वागत केले़ सकाळी उशिरापर्यंत ही मैफल रंगली होती़ ़़़़़़़़़़़फोटो ओळी: दिवाळी पहाट बहारदार कार्यक्रमात गायन करताना सुधाकर सुर्यपुजारी़ समवेत राजेंद्र आंधळे, विकास बडे आदी़