शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला घटस्फोट, महिलेशी जवळीक..., योग शिक्षकाला ७ फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडले, तीन महिन्यांनी सापडला मृतदेह  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:48 IST

Haryana Crime News:

हरयाणामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील रोहतक जिल्ह्यात असलेल्या बाबा मस्तनाथ विद्यापीठामधून मागच्या ९१ दिवसांपासून बेपत्ता असलेले योग शिक्षक जयदीप यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. आरोपींनी जयदीप यांना चरखी दादरी जिल्ह्यातीलल एका शेतामध्ये जिवंत पुरले होते. त्यांचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत सापडला आहे.

या हत्येबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप यांचा घटस्फोट झालेला आहे. तसेच गेल्या काही काळापासून त्यांची एका महिलेसोबत जवळीळ निर्माण झाली होती.  आरोपींनी आधी जयदीपचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला दादरीमधील पैंतवास गावामध्ये जिवंत पुरले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी हरदीप आणि धर्मपाल यांना अटक केली असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शोध घेऊन जयदीप याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

जयदीप हे रोहतक येथील बाबा मस्तनाथ विद्यापीठामध्ये योग शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच रोहतक येथे भाड्याच्या घरात राहत होते. यादरम्यान, ते कधी कधी नातेवाईकांना भेटण्यासाठी घरी जायचे. मात्र २४ डिसेबंर २०२४ पासून ते अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. अखेरीस आता तीन महिन्यांनंतर त्यांचा मृतदेह पैंतावास कलां गावात एका शेतामध्ये पुरलेल्या स्थितीत सापडला. 

या प्रकरणी रोहतक पोलिसांनी हरदीप आणि धर्मपाल यांना अटक केली आहे. या दोघांनीही या गावातील राजकरणच्या मदतीने जयदीप यांचं अपहरण केलं होतं. मात्र ज्या महिलेसोबत जयदीप यांची जवळीक होती, ती कोण आहे आणि आरोपींसोबत तिचा काय संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणा