पत्नीच्या वाढदिवसाला व्हॉट्स अॅपवरुन घेतला तलाक
By Admin | Updated: April 24, 2017 17:47 IST2017-04-24T16:43:58+5:302017-04-24T17:47:51+5:30
गेल्या काही महिन्यांपासून ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर वातावरण पेटले असताना हैदराबादमध्ये असेच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे

पत्नीच्या वाढदिवसाला व्हॉट्स अॅपवरुन घेतला तलाक
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 24 - गेल्या काही महिन्यांपासून ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर वातावरण पेटले असताना हैदराबादमध्ये असेच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील सुमायना नामक महिलेला तिच्या पतीने दुबईवरून व्हॉट्स अॅवर तलाक घेतला आहे. विशेष म्हणजे हा तलाक तिला तिच्या वाढदिवसादिवशी पाठवला आहे. व्हॉट्स अॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये त्याने हा तुझा बर्थडे गिफ्ट समज असेही म्हटले आहे.
सुमायनाचे 2015 मध्ये ओवेस तालिबशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली. तेंव्हापासून दोघामध्ये वाद सुरु झाला होता. त्यानंतर दोघेही वेगळे राहत होते. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ओवेसने व्हॉट्स अॅपवरुन तलाक घेतला होता. सध्या ट्रिपल तलाकचे वातावरण गरम असल्यामुळे हे प्रकरण समोर आले आहे. हैदराबद येथील सनथनगर पोलिस स्थानकात सुमायना नवऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सुमायनाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ओवेस तालिब विरोधात 420, 406, 506 १/६ 34 गुन्ह्याची नोंद केली आहे. सुमायनाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सासू-सासरे आपल्यावर काळी जादू करत होते. तसेच मानसिक आणि शारीरिक छळ सुद्धा करत होते. व्हॉट्सअॅपवरून तलाकचा मॅसेज आल्यानंतर आपल्या वडिलांनी माहेरी आणल्याचे तिने सांगितले.
मॅसेजमध्ये सुमायनाच्या पतीने लिहिले, तलाक, तलाक, तलाक. हा माझा अंतिम निर्णय आहे. कुणाला घेऊन येतेस आण... कुणाला सांगणार ते सांग... कुणाचा बापही माझे काही वाईट करू शकणार नाही. तुला हेच हवे होते ना... घे तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट...