उत्तराखंडमध्ये पतीने पत्नीला 'SMS'द्वारे दिला घटस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2016 14:25 IST2016-02-03T14:23:37+5:302016-02-03T14:25:03+5:30
उत्तराखंड राहणा-या इसमाने पत्नीशी होणा-या भांडणांना कंटाळून तिला एसएमएसद्वारेच घटस्फोट दिला

उत्तराखंडमध्ये पतीने पत्नीला 'SMS'द्वारे दिला घटस्फोट
ऑनलाइन लोकमत
हरिद्वार, दि. ३ - आजच्या टेक्नोसॅव्ही युगात अनेक जण जेव्हा मोबाईलद्वारे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे किस्से प्रसिद्ध आहेत, त्याच युगात पत्नीशी होणा-यां भांडणांना कंटाळून एका इसमाने त्याच्या पत्नीला एसएमएसद्वारे घटस्फोट दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तराखंड राहणा-या इसमाने पत्नीच्या भांडखोर स्वभावाला कंटाळून तिला डिव्होर्स दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं, मात्र तेव्हापासूनच त्यांच्यात खटके उडत होते. ज्वालापूरचा रहिवासी असलेल्या या नवविवाहीत इसमाचे लग्नाच्या दिवसापासून बायकोशी भांडण होत होतं. हे दोघेही ज्वालापूर पोलिस स्थानकात जाऊन आल्यानंतर त्याची पत्नी माहेरी गेली असतानाच त्याने तिला एसएमएस करून तिला घटस्फोट देत असल्याचे जाहीर केले.