मुलगी झाल्यामुळे तलाक देणे ‘हराम’

By Admin | Updated: September 24, 2015 09:12 IST2015-09-23T22:26:29+5:302015-09-24T09:12:34+5:30

पत्नीने मुलीला जन्म दिला म्हणून तलाक देणे बेकायदा आणि ‘हराम’ (इस्लामविरोधी) असल्याचा फतवा दारुल- उलूम- देवबंद या प्रभावी इस्लामी धर्मसंस्थेने मंगळवारी जारी केला आहे.

Divorce due to daughter 'haram' | मुलगी झाल्यामुळे तलाक देणे ‘हराम’

मुलगी झाल्यामुळे तलाक देणे ‘हराम’

लखनौ : पत्नीने मुलीला जन्म दिला म्हणून तलाक देणे बेकायदा आणि ‘हराम’ (इस्लामविरोधी) असल्याचा फतवा दारुल- उलूम- देवबंद या प्रभावी इस्लामी धर्मसंस्थेने मंगळवारी जारी केला आहे. वादग्रस्त फतव्यांसाठी परिचित असलेल्या दारुल उलूमचा हा फतवा मात्र मुस्लिमांमधील पुरोगामी विचारसरणीच्या लोकांसाठी दिलासादायक मानला जातो.
मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीला तलाक दिल्याचे अनेक प्रकार यापूर्वीही समोर आले असताना हा फतवा तडकाफडकी जारी करण्याचे कारणही तसेच आहे. मुझफ्फरनगरमधील एक इसम रियाधमध्ये काम करतो. त्याने चौथीही मुलगी झाल्याचे कळताच रियाधहून पत्नीला फोन करून तलाक दिल्याने हे प्रकरण पंचायतीकडे गेले होते. पंयायतीने तलाक मंजूर केल्यानंतर कुणीतरी दारुल-उलूमचा सल्ला मागितला होता.
फोनवरून तलाकही गैरच
या महिलेला फोनवरून तलाक देण्यात आल्याबद्दल या धर्मसंस्थेचे प्रवक्ते अश्रम उस्मानी यांनी संताप व्यक्त केला. हजारो मैल अंतरावर असलेल्या सहचारिणीला फोनवरून तलाक देणे संतापजनक असल्याचे त्यांनी म्हटले. ही अमानवी वर्तणूक असून पती-पत्नीचे नाते, असे कृत्य पाहता इस्लामविरोधी ठरते. स्थानिक पंचायतीने या प्रकरणी महिलेची बाजू योग्य न मानणे दुर्दैवी आहे. इस्लाममध्ये अशा प्रकारचा तलाक पूर्णपणे अस्वीकारार्ह (हराम) ठरतो, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Divorce due to daughter 'haram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.