शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

निकाहानंतर एका तासातच झाला तलाक; नववधूने केलं नवरदेवाच्या लहान भावाशी लग्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 10:19 IST

तरुणाने एका तरुणीशी मोठ्या थाटामाटात निकाह केला. मात्र यानंतर मोठा गोंधळ झाला. काही वेळातच दोघांचा तलाक झाला आणि या तरुणीचं लग्न नवरदेवाच्या लहान भावाशी झालं. 

उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना आता समोर आली आहे. संभलच्या असमोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक विचित्र प्रकार घडला आला. अमरोहा येथून वरात घेऊन आलेल्या तरुणाने असमोली परिसरातील गावात एका तरुणीशी मोठ्या थाटामाटात निकाह केला. मात्र यानंतर मोठा गोंधळ झाला. काही वेळातच दोघांचा तलाक झाला आणि या तरुणीचं लग्न नवरदेवाच्या लहान भावाशी झालं. 

नवरदेवाची पहिली पत्नी अचानक तिथे आल्याने हा गोंधळ उडाल्याची माहिती मिळत आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचलं. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी पंचायत बसली आणि पंचायतीच्या आदेशावरून अखेर हा अजब निर्णय घेण्यात आला. अमरोहा जिल्ह्यातील सैदगनली पोलीस स्टेशन हद्दीतील गावातला रहिवासी असलेल्या एका तरुणाचं चार वर्षांपूर्वी याच परिसरातील तरुणीसोबत निकाह झाला होता. 

पतीसोबत वाद झाल्यानंतर महिला आपल्या माहेरी निघून गेली. दरम्यान, बुधवारी हा तरुण दुसऱ्या निकाहसाठी संभल जिल्ह्यातील असमोली परिसरात राहणाऱ्या एका गावात पोहोचला. निकाह पूर्ण झाला, इतक्यात तिथे तरुणाची पहिली पत्नी आली. महिलेने या लग्नाला विरोध करत गोंधळ घातला. महिलेने पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावर पोलिसांनीही घटनास्थळ गाठून दुसरा निकाह करणाऱ्याला पकडून पोलीस ठाण्यात नेलं.

पोलिसांची कारवाई पाहून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पंचायत बोलवण्यात आली. पंचांनी फर्मान काढलं की त्या तरुणाने नुकतंच निकाह केलेल्या मुलीला तलाक द्यायचा आणि तिचं लग्न नवरदेवाच्या लहान भावासोबत लावायचं. पंचायतीच्या निर्णयानंतर नवरदेवाने तासाभरातच नवरीला तलाक दिला. त्यानंतर तरुणीचं नवरदेवाच्या लहान भावाशी लग्न झालं. निकाहच्या तासाभरात तलाक आणि दुसरं लग्न याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न