प्रभाग-८- गोरेवाडा-२
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:44+5:302015-02-15T22:36:44+5:30
बॉक्स...

प्रभाग-८- गोरेवाडा-२
ब क्स... सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे प्रभागात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. रस्त्याच्या कडेलाच लोक कचरा फेकतात. दररोज कचरा उचलला जात नसल्याने तो इतरत्र पसरतो. त्यामुळे घाण होते. गोरेवाडा वस्तीमध्ये गाई-म्हशीचे गोठे असल्याने शेणाचे ढिगारेसुद्धा जागोजागी आहेत. त्यासोबतच बोरगाव बौद्धविहार, दिनशॉ फॅक्टरीजवळ कचऱ्याचे ढिगारे साचलेले असतात. बॉक्स.. पाण्याच्या पाईपलाईनमुळे मंजूर सिमेंट रोडचे काम रखडले गोरेवाडा परिसरात पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. पेंच-१, पेंच-२, पेंच-३ आणि पेंच-४ प्रकल्प येथे सुरू आहेत. संपूर्ण शहराला येथूनच पाणीपुरवठा केला जातो. येथील पाणी शहरातील वेगवेगळ्या मोठ्या टाक्यांमध्ये साठवले जाते आणि तेथील शहरभरात पाणी वितरित केले जाते. त्यासाठी येथून मोठ्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. या पाईपलाईन गोरेवाडा ते गिट्टीखदानदरम्यान असलेल्या रस्त्याला लागून गेल्या आहेत. गिट्टीखदान ते गोरेवाडा या रोडचे सिमेंटीकरण करण्याच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे. तीन कोटी रुपयांमधून या रस्त्यांचे सिमेंटीकरण होणार होते. परंतु पाण्याची पाईपलाईन भलीमोठी असल्याने सिमेंटचा रस्ता रखडला आहे. पाईपलाईन काढण्याच्या कामासाठीच नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या तरी या रस्त्याचे सिमेंटीकरण रखडले आहे. बॉक्स.. रस्त्यावरील विद्युत खांबांमुळे वाहनचालकांना त्रास गिट्टीखदान ते गोरेवाडा या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीच लहान रस्ता आता चांगलाच रुंद झाला आहे. परंतु रस्ता रुंदीकरणात जुने विद्युत खांब ऐन रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे रस्ता रुंद झाला असला तरी वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. बॉक्स.. पथदिवे बंद गिट्टीखदान ते गोरेवाडा रोड आणि मानकापूर ते काटोल रोड नाकादरम्यानचा रिंगरोड यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होतो. गोरेवाडा रिंगरोड आधीच अपघातांसाठी कुख्यात आहे. येथे झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असताना येथील पथदिवे बंद असूनही याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.