प्रभाग-८- गोरेवाडा-५

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:25+5:302015-02-15T22:36:25+5:30

Division-8- Gorevada-5 | प्रभाग-८- गोरेवाडा-५

प्रभाग-८- गोरेवाडा-५

> नगरसेवकांच्या प्रतिक्रिया
---------------
रस्ते व गटारीची कामे मोठ्या प्रमाणावर
गोरेवाडा प्रभागात आरक्षित असलेल्या जागा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अविकसित भाग आहे. महापालिकेला येथे कामच करता येत नाही. असे असले तरी गेल्या तीन वर्षात आपण प्रभागात गटारी रस्ता डांबरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. जवळपास १६ ते १७ कोटी रुपयांची कामे आपण केली आहे. रस्त्यांची कामे अजूनही सुरू आहेत. गोरेवाडा स्मशानभूमीचे कामही हाती घेण्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईल. प्रभागात एकही मैदान व उद्यान नाही. त्यादिशेनेही आपला प्रयत्न सुरू आहे. गोरेवाडा ते गिट्टीखदान रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मागील २० वर्षांपासून रखडले होते. ते आपण पूर्ण केले. याशिवाय आणखी अनेक कामे हाती घेण्यात आली असून ती तातडीने पूर्ण करण्यावर आपला भर आहे.
भूषण शिंगणे
नगरसेवक
--------
आरक्षित जागांमुळे मुख्य अडचण

प्रभागात आरक्षित जागा मोठ्या प्रमाणावर असल्याने अविकसित भाग आहे. आरक्षण अजूनही हटलेले नाही. परंतु ले-आऊट पडले. त्यामुळे काम करण्यात अडचणी येतात. असे असले तरी आपण रस्ते, गटार, पथदिवे लावणे आदी कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. नगरसेवकांना मिळणारा निधी कमी पडत असेल तर आपण आमदार निधीतूनही कामे करवून घेतली आहे. आमदारांचेही सहकार्य मिळत असल्याने प्रभागातील समस्या सोडविण्यावर आपण अधिक भर देत आहोत.

मीना तिडके
नगरसेवक

Web Title: Division-8- Gorevada-5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.