प्रभाग-६-जरीपटका-४

By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:00+5:302015-01-29T23:17:00+5:30

Division-6-Jarpakka-4 | प्रभाग-६-जरीपटका-४

प्रभाग-६-जरीपटका-४

> पथदिव्यांची व्यवस्था करावी - विजय डोंगरे

जुना जरीपटका भाग हा अजूनही विकासाच्या बाबतीत मागासलेलाच आहे. साधे पथदिवे सुद्धा आमच्या वस्तीत नाही. त्यामुळे मोठी अडचण होते. सायंकाळ होताच वस्ती सामसूम झाल्यासारखी वाटते. किमान पथदिवे लावण्यात यावेत. तसेच साफसफाईकडे अधिक लक्ष देण्यात यावे.

- शौचालयांची सफाई आवश्यक - राकेश श्रीवास
जुना जरीपटका परिसरातील नागरिक सार्वजनिक शौचालयांचाच वापर करतात. सार्वजनिक शौचालये आहेत, मात्र सफाई करण्यासाठी कुणीच येत नाही. किमान महिन्यातून एकदा तरी सफाई व्हावी, ही अपेक्षा.

शौचालयांची दारे दुरुस्त करावीत - संगीता राऊत

सार्वजनिक शौचालये वस्तीतच आहेत. त्यांना दारे नाहीत. महिला घराबाहेर काम करीत असतात. अशा वेळी पुरुष मंडळी शौचालयात जातात. तेव्हा दार नसल्याने महिलांना मोठी अडचण होत असते. अस्वच्छता तर आहेच मात्र सार्वजनिक शौचालयांना दारे बसविणे अतिशय गरजेचे आहे. प्रशासनाला निवेदने दिली मात्र काहीच झाले नाही.

नळ यायची निश्चित वेळ असावी - शीतल चौधरी

वस्तीत नळ आहेत. तीन घरांना मिळून नळाचे एक कनेक्शन देण्यात आले आहे. परंतु नळ यायची कुठलीही ठराविक वेळ नाही. एक दिवस येतो तर दुसऱ्या दिवशी येत नाही. नळ यायची एखादी वेळ निश्चित असावी. तसेच दररोज नळ सोडण्यात यावा.
सफाई करणारे येतच नाहीत - किसन चांदूरकर
आमच्या वस्तीमध्ये सर्वत्रच अस्वच्छता दिसून येते. कारण साफसफाई करणारे कर्मचारी इकडे फिरकूनच पाहत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक शौचालयाचीसुद्धा दयनीय अवस्था झाली आहे. पाण्याची सुद्धा समस्या कायम आहे.

नगरसेवक
-------
गडर लाईन व पाण्याची समस्या सोडविण्यात यश

जरीपटका हा प्रभाग अतिशय जुना आहे. येथील सर्वात महत्त्वाची समस्या ही कन्झर्व्हेशन गडरलाईनची होती. दोन घरांमध्ये असलेल्या गडर लाईन होत्या. त्या साफ करण्यास खूप अडचणी येत होत्या. ती समस्या दूर केली. आता गल्ल्यांमध्ये फ्लोरिंगचे काम सुरु केले आहे. पाण्याची समस्या होती. नळाची लाईन आलेली आहे. परंतु ओसीडब्ल्यूचे कर्मचारी सक्षम नसल्याने पाणी येण्यास काही ठिकाणी अडचणी येत आहेत. सर्वांना सोबत खेऊन आणखी विकास कामे करण्यावर आपला भर आहे.
सुरेश जग्यासी
नगरसेवक - जरीपटका

Web Title: Division-6-Jarpakka-4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.