प्रभाग-४ महेंद्रनगर - ५
By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:54+5:302015-01-23T01:03:54+5:30
पाण्यासाठीच धावपळ अधिक - जेबानाज

प्रभाग-४ महेंद्रनगर - ५
प ण्यासाठीच धावपळ अधिक - जेबानाज सर्वात मोठी समस्या ही पाण्याचीच आहे. जास्तीत जास्त पाणी कसे साठवून ठेवता येईल, यासाठी धावपळ होत असते. घरातील सर्वांचीच मदत घ्यावी लागते. पाण्यासाठी घरातील इतर लोकांचाही त्यात अधिक वेळ जातो. त्यामुळे नळाची लाईन तातडीने टाकण्यात यावी. तसेच रस्त्याचे डांबरीकरण करावे. गडरलाईन टाकण्यात यावी - सलीमा परवीन आमच्या वस्तीमध्ये गडर लाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठी अडचण होते. आजूबाजूला नाल्याचा परिसर असल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण असते. आमच्या वस्तीला लागूनच असलेल्या वस्तीत मात्र नळ, गडर लाईन आहे. रस्तेही चांगले बनवण्यात आले. परंतु आमच्याच वस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. निधीची कमतरता मुख्य समस्या प्रभागात खूप समस्या आहेत. ही बाब खरी आहे. रस्ते, वीज, नळाची पाईपलाईन, गडर लाईन आदी कामांचे अनेक प्रस्ताव तयार करून महापालिकेकडे सादर केले. परंतु निधी नाही, असेच सांगितले जाते. झोन अधिकारी सुद्धा कामाबाबत उदासीन असतात. काम करण्याची खूप इच्छा असुनही निधीमुळे ते शक्य होत नाही. रस्ते, वीज, पाणी अशा एक ना अनेक समस्या आहेत. तरीही मिळणाऱ्या निधीतून शक्य तो विकास साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मो. अस्लम खान नगरसेवक