प्रभाग-४ महेंद्रनगर-४

By Admin | Updated: January 23, 2015 01:04 IST2015-01-23T01:04:04+5:302015-01-23T01:04:04+5:30

Division-4-Mahendranagar-4 | प्रभाग-४ महेंद्रनगर-४

प्रभाग-४ महेंद्रनगर-४

> जीवघेणे खड्डे बुजवा - सलाम खान
बंदेनवाजनगर येथे अनेक प्लॉट मोकळे आहेत. त्यावर घर बांधण्यात आलेले नाही. परंतु काही जणांनी घर बांधण्यासाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. ते तसेच आहेत. त्यात पाणी साचून असल्याने हे खड्डे जीवघेणे बनले आहेत. त्यामुळे ते खड्डे बुजवण्यात यावे, जागा समतल करण्यात यावी.

समाजभवनाची आवश्यकता - अब्दुल गफुर कुरैशी
बंदेनवाजनगर परिसरात एकही समाजभवन नाही. वस्तीतील नागरिकांच्या सामाजिक कार्यासाठी समाजभवनाची गरज आहे. परिसरात एक मोकळे मैदान आहे. या मैदानाच्या चारही बाजूंनी सुरक्षा भिंत तयार करण्यात यावी. तसेच तिथे एक समाजभवन निर्माण करावे. त्याचा उपयोग सर्वांनाच करता येईल.

नळाची लाईन अतिशय आवश्यक - अब्दुल कादीर
येथील मुख्य समस्या ही पाण्याची आहे. टँकरद्वारा पाणी उपलब्ध होत असते. परंतु नळाची पाईपलाईन आल्यास पाणी मिळणे सहज होईल, तेव्हा किमान पाण्याची लाईन प्रशासनाने टाकावी, ही विनंती. तसेच गरीबनवाजनगर परिसरात रस्ते नाही. कच्चे रस्ते आहेत. तेव्हा किमान बुलडोजरने रस्त्यांना मजबूत तरी करण्यात यावे.

नियमित स्वच्छता व्हावी - दीपक गौर
महेंद्रनगर, फारुखनगर आदी परिसरात अस्वच्छतेचे वातावरण आहे. उघड्यावर कचरा फेकला जातो. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरते. किमान नियमित कचरा उचलण्यात यावा. तसेच उघड्या गटारी बंद कराव्यात.

मैदानात पथदिवे लावावेत - विजय मेश्राम
महेंद्रनगर येथील एकमेव असलल्या मैदानात पथदिवे नाहीत. मैदानातच मंदिर आहे. त्यामुळे सायंकाळ व रात्रीच्या सुमारास परिसरातील नागरिक मैदानात फिरायला येतात. गप्पा मारत बसतात. तेव्हा किमान पथदिवे लावण्यात यावे. तसेच मैदानाचा विकास करावा.

पाण्याची मोठी अडचण - कमरुन्नीसा
बंदेनवाजनगर येथे पाण्याची मोठी अचडण आहे. नळ आलेले नाहीत. त्यामुळे टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. दररोज टँकर येतात. मात्र पिण्यासह धुणी-भांडी करायलाही पाणी लागते. त्यामुळे जास्तीतजास्त पाणी भरून ठेवावे लागते. घरातील लोक असले तर मदत होते.

Web Title: Division-4-Mahendranagar-4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.