प्रभाग -४ महेंद्रनगर-३

By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:02+5:302015-01-23T01:05:02+5:30

बॉक्स..

Division-4-Mahendranagar-3 | प्रभाग -४ महेंद्रनगर-३

प्रभाग -४ महेंद्रनगर-३

क्स..
अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात

महेंद्रनगर प्रभागात विविध ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. उघड्यावरच कचरा, उघड्या गटारी, इतकेच नव्हे तर साचलेल्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. यशोदीप कॉलनीमध्ये एक कॉन्व्हेंट स्कूल आहे. या शाळेला लागून मागच्या बाजूला उघड्या जागेवर पाणी साचून चिखलाचे डबके तयार झाले आहे. या डबक्यात गायी म्हशींचा मुक्त संचार असतो. तसेच डुकरे सुद्धा बसून असतात. अगदी शाळेला लागून असल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
उद्यान विकसित करावे - फिरोज खान
महेंद्रनगर येथे एकही मैदान किंवा उद्यान नाही. शीतला माता मंदिर परिसरात मोठे मैदान आहे. त्याला मैदान आणि उद्यान म्हणून विकसित करता येईल. सध्या या मैदानात कुठल्याही सुविधा नाही. त्यामुळे अगोदर मैदान आणि नंतर उद्यान तयार करावे.

लहान मुलांसाठी मैदान असावे - मनीष जीवनकर
महेंद्रनगर येथील प्राथमिक उर्दु शाळा आहे परंतु या शाळेत मैदान नाही. त्यामुळे मुलांना शाळेच्या बाहेर असलेल्या मोकळ्या मैदानाचा वापर करावा लागतो. ते मैदान येथील मुलांसाठी कायमस्वरुपी उपलब्ध करून द्यावे आणि त्याचा विकास करावा.

टँकरचालकांचा मोठा त्रास - कुंदाताई लोखंडे
यशोदीपनगर येथे पाण्याची मोठी टाकी आहे. त्यामुळे येथे दिवसभर टँकरची रेलचेल असते. टँकरला येण्याजाण्यासाठी रस्ता असूनही टँकर दिवसभर घरासमोरच्या रस्त्यांचाच वापर करतात. त्यांच्यासाठी असलेल्या रस्त्यांचा वापर त्यांनी करावा. तसेच परिसराील उघड्या प्लॉटवर पाणी साचून डबके तयार झाले आहेत. त्यात जनावरांचा मुक्त वावर असतो. हा प्रकार बंद व्हावा.

असमतोल विकास : डॉ. शादाब अहमद
महेंद्रनगर प्रभागाचा विकास हा असमतोल पद्धतीने झाला आहे. काही भागांमध्ये चांगले रस्ते आहेत. नळाच्या पाईपलाईन, गडरलाईन सर्व सुविधा आहेत. परंतु बंदेनवाजनगर मात्र या सर्व विकासापासून वंचित आहे. येथे रस्ते नाहीत. नळ नाही. गडर लाईन नाही. हा दुजाभाव संपवावा.

Web Title: Division-4-Mahendranagar-3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.